coronavirus: धक्कादायक ! २४ तासांत राज्यात ४२४ पोलिसांना कोरोना, ५ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 04:04 AM2020-09-04T04:04:17+5:302020-09-04T04:05:33+5:30

दिवसभरातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या

coronavirus: shocking! In 24 hours, 424 policemen lost their lives in the state | coronavirus: धक्कादायक ! २४ तासांत राज्यात ४२४ पोलिसांना कोरोना, ५ जणांनी गमावला जीव

coronavirus: धक्कादायक ! २४ तासांत राज्यात ४२४ पोलिसांना कोरोना, ५ जणांनी गमावला जीव

Next

मुंबई - अनलॉकच्या काळात पोलिसांभोवती कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकट वाढत असताना, राज्यात गेल्या २४ तासांत ४२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली, तर पाच पोलिसांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची एकूण संख्या १६३ वर पोहोचली आहे.  
                 
आतापर्यंत दिवसाला तीनशे ते साडेतीनशेचा पल्ला गाठणाऱ्या कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येने मागील २४ तासांत चारशेचा आकडा पार केला. ही आतापर्यंतची दिवसभरातील कोरोनाबाधित पोलिसांची ही सर्वाधिक संख्या आहे. ज्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला त्यात ठाणे, नवी मुंबई, नागपूर ग्रामीण, नांदेड आणि वर्धा येथील पोलिसांचा समावेश आहे.     

अनलॉकचा फटका
जूनपासून अनलॉक सुरू झाले आणि रहदारी वाढली. रस्त्यावर उभे राहून आॅनड्यूटी २४ तास असणाºया पोलिसांचा नागरिकांशी संपर्क वाढला. त्यामुळे पोलिसांभोवतीचे कोरोना प्रादुर्भावाचे संकट वाढत असल्याचे बंदोबस्तावरील पोलिसांचे म्हणणे आहे.  
राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची स्थिती
१६,०१५ एकूण रुग्ण
१,७३६ अधिकारी
१४,२७९ कर्मचारी
२,८३८ उपचार सुरू
१६३ मृत्यू

 

Web Title: coronavirus: shocking! In 24 hours, 424 policemen lost their lives in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.