CoronaVirus News : Mumbai Mayor Kishori Pednekar's elder brother dies due to corona | CoronaVirus News : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मानलेल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

CoronaVirus News : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मानलेल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

ठळक मुद्देमुंबईसह उपनगरात कोरोनाचे 1 लाख 14 हजार 284 रुग्ण आहेत. त्यापैकी 87 हजार 074 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा मानलेला भाऊ सुनिल कदम यांचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर या देखील होम क्वारंटाइन झाल्या होत्या. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होते. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन झाल्या होत्या. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर या 14 दिवस घरीच होत्या. 

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंविस वाढत आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण संख्या आहे. एकट्या मुंबईसह उपनगरात कोरोनाचे 1 लाख 14 हजार 284 रुग्ण आहेत. त्यापैकी 87 हजार 074 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 6353 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. याचबरोबर, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 57,117 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 764 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 16 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 36,511 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

आणखी बातम्या....

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका    

मराठी कुटुंबांसाठी 'संकटमोचक' ठरले मसालाकिंग दातार; 136 महाराष्ट्रीय मायदेशी

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर 'डिजिटल स्ट्राइक', टिकटॉकवर घातली बंदी  

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

CoronaVirus News : कोरोना व्हायरसच्या लसीवरून राजीव बजाज यांचं मोठं विधान, म्हणाले...    

CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा    

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : Mumbai Mayor Kishori Pednekar's elder brother dies due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.