CoronaVirus News : वयात येणाऱ्या मुलांसाठी 'क्वारंटीन वॉर्मलाईन'; लॉकडाऊनमध्ये करा मनमोकळी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 05:56 PM2020-05-11T17:56:30+5:302020-05-11T18:15:45+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वयात येणाऱ्या मुलांच्या मनात शारीरीक आणि मानसिक बदलांबाबत असंख्य प्रश्न असतात. मात्र आई-वडिलांना अथवा इतर मोठ्या मंडळींना त्याबाबत प्रश्न विचारण्यास त्यांना अनेकदा संकोच वाटतो तर कधी भीती वाटत असते.

CoronaVirus Marathi News Helpline Fellow Teens Feeling Anxious During Quarantine SSS | CoronaVirus News : वयात येणाऱ्या मुलांसाठी 'क्वारंटीन वॉर्मलाईन'; लॉकडाऊनमध्ये करा मनमोकळी चर्चा

CoronaVirus News : वयात येणाऱ्या मुलांसाठी 'क्वारंटीन वॉर्मलाईन'; लॉकडाऊनमध्ये करा मनमोकळी चर्चा

Next

मुंबई - जगभरातील अनेक देश सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह काही देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर दुसरीकडे शाळा बंद असल्याने मुलांना घरी बसून कंटाळा आला आहे. याच दरम्यान विविध प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. विशेष करून वयात येणाऱ्या मुलांच्या मनात शारीरीक आणि मानसिक बदलांबाबत असंख्य प्रश्न असतात. मात्र आई-वडिलांना अथवा इतर मोठ्या मंडळींना त्याबाबत प्रश्न विचारण्यास त्यांना अनेकदा संकोच वाटतो तर कधी भीती वाटत असते. मात्र आता घाबरण्याचं काही कारण नाही कारण वयात येणाऱ्या मुलांना कोरोना लॉकडाऊनमध्ये मनमोकळी चर्चा करता येणार आहे. 

वयात येणाऱ्या मुलांच्या प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करण्यासाठी "क्वारंटीन वॉर्मलाईन" ने पुढाकार घेतला आहे. मुलं वयात येताना त्यांना साहजिकच वेगवेगळे प्रश्न पडतात. पण मुलांच्या अशा प्रश्नांना उत्तर देणं अनेकदा मोठी माणसं टाळतात. त्यामुळेच मुलं आणखी गोंधळतात आणि नेमकं हे सगळं काय आहे याबाबत अधिकचा विचार करू लागतात. मुलांच्या मनात असलेल्या या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी क्वारंटीन वॉर्मलाईन कार्यरत आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये ते मुलांशी या विषयावर मोकळेपणाने चर्चा करून त्यांना समजून घेण्याचा, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

क्वारंटीन वॉर्मलाईन वयात येणाऱ्या मुलांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या काळात मनात असलेली गोष्ट मुलांना वॉर्मलाईनच्या माध्यमातून सांगता येणार आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अशा वॉर्मलाईन आहे. भारतात पहिल्यांदाच क्वारंटीन वॉर्मलाईन सुरू करण्यात आली आहे. तारा दवे या 16 वर्षांच्या मुलीने आपल्या पाच मित्र-मैत्रिणींसह या वॉर्मलाईनची सुरुवात केली आहे. हे सर्वजण आपल्या घरातून वयात येणाऱ्या मुलांशी संवाद साधत आहेत. 

वॉर्मलाईनच्या माध्यमातून वयात येणाऱ्या मुलामुलींच्या नेमक्या काय समस्या आहेत?, त्यांना याबद्दल काय वाटतं? हे जाणून घेतलं जात आहे. तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य तंत्राचा देखील वापर केला जाणार आहे. वॉर्मलाईनशी संपर्क साधल्यानंतर मुलांना एक कॉल येईल आणि संवादातून त्यांना त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळतील. वॉर्मलाईनच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला जात असताना त्यांच्यावर कोणतीही टीका न करता तसेच निष्कर्ष न काढता त्यांचं म्हणणं ऐकलं जाणार आहे. अधिक माहितीसाठी +91 9132913298 या क्रमांकावर संपर्क साधता येईल तसेच https://www.instagram.com/quaranteenwarmline/ यावरून ही माहिती मिळवू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : होम क्वारंटाईन कधी संपणार?; आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल

CoronaVirus News : 'सोनिया गांधींनी तुमच्या तिकिटाचे पैसे दिलेत'; काँग्रेस आमदाराने वाटली पत्रकं

CoronaVirus News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! सोपा नसणार रेल्वेप्रवास, 'या' गोष्टी जाणून घ्या

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

CoronaVirus News : लय भारी! 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने फोन, नोटा करा सॅनिटाईज

CoronaVirus News : धक्कादायक! २४ तासांत राज्यभरात २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा

 

Web Title: CoronaVirus Marathi News Helpline Fellow Teens Feeling Anxious During Quarantine SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.