CoronaVirus News : लय भारी! 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने फोन, नोटा करा सॅनिटाईज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:48 AM2020-05-11T11:48:07+5:302020-05-11T12:31:42+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने सॅनिटायझरच्या मदतीने हात धुण्याचा सल्ला हा दिला जातो. मात्र फोन, पैसे, लॅपटॉप अशा इतरही अनेक वस्तू आपल्याकडे असतात. त्यावर ही व्हायरस जिवंत राहू शकतो.

कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सर्वच राज्य कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत तर अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे

कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 17 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.

कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 67152 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2206 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

देशातील काही राज्यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. काही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने सॅनिटायझरच्या मदतीने हात धुण्याचा सल्ला हा दिला जातो. मात्र फोन, पैसे, लॅपटॉप अशा इतरही अनेक वस्तू आपल्याकडे असतात. त्यावर ही व्हायरस जिवंत राहू शकतो.

आता काळजी करण्याचं काही गरज नाही कारण रोजच्या वापरतील फोन, पैसे यासह इतरही वस्तू या तंत्रज्ञानाच्या मदतीने सॅनिटाईज करता येणार आहेत.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डिआरडीओने (DRDO) कोणताही संपर्क न करता फोन निर्जंतूक करणारे उपकरण विकसित केले आहे.

डीआरडीओच्या हैदराबाद येथील प्रयोगशाळेत हे उपकरण तयार करण्यात आले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयुएस) असे या उपकरणाचे नाव ठेवण्यात आले आहे.

सर्व प्रकारचे फोन, आयपॅड, लॅपटॉप, चलनी नोटा यासह काही वस्तू या उपकरणाच्या माध्यमातून निर्जंतूक करता येणार आहेत

या उपकरणाला एक प्रोक्झिमिटर सेन्सर बसवण्यात आले आहे. उपकरण सुरू केल्यावर ते स्वतः वस्तूंच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण करतं.

डीआरयुएस उपकरणात फोनसह इतरही वस्तू निर्जंतूक केल्या जातात. निर्जंतुकीकरण पूर्ण झाल्यावर उपकरण स्वतःहून स्लिप मोडमध्ये जातं.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण असताना मानवी संपर्काची गरज भासत नसल्याची माहिती डीआरडीओने दिली आहे.