Coronavirus : मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 04:56 PM2020-05-21T16:56:42+5:302020-05-21T16:58:54+5:30

Coronavirus त्यांची मरणोत्तर कोरोना तपासणी करण्यात आली होती. गुरुवारी त्यांच्या अहवालात त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

Coronavirus: Another Mumbai policeman died due to coronavirus pda | Coronavirus : मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

Coronavirus : मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

Next
ठळक मुद्देपोलीस दलातील कोरोनाग्रस्ताची संसर्ग वाढत असताना त्याला बळी पडणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे.पोलीस हेड कॉन्सटेबल हे दहशतवाद विरोधी पथक नागपाडा युनिट येथे 11 मे 2020 पासून टायफ़ॉइडवर उपचार घेत होते.

मुंबई - दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) हेड कॉन्स्टेबलचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. मुंबई पोलीस दलातील हा अकरावा बळी आहे. तर आतापर्यंत राज्यभरात १६ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

पोलीस हेड कॉन्सटेबल हे दहशतवाद विरोधी पथक नागपाडा युनिट येथे 11 मे 2020 पासून टायफ़ॉइडवर उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच 17 मे 2020 रोजी पहाटे 3.00 वाजताच्या सुमारास त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होवू लागल्याने त्याना नागपाडा मोबाईल 1 ने  प्रथम नायर आणि  तेथून भाटीया रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केले. त्यांना मधुमेहाचा देखील आजार होता. त्यांची मरणोत्तर कोरोना तपासणी करण्यात आली होती. गुरुवारी त्यांच्या अहवालात त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलीस दलातील कोरोनाग्रस्ताची संसर्ग वाढत असताना त्याला बळी पडणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. अलीकडेच मुंबई पोलीस दलातील एका तरुण सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मागच्या शनिवारी पहाटे या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याचे वय अवघे 32 वर्षे होते.

शाहूनगर येथे कार्यरत असलेल्या या  अधिकाऱ्याने ताप व सर्दी असल्याने काही दिवसापासून आजारी रजा काढून प्रतीक्षानगरातील घरी आराम करीत होते. त्यांनी 13 मे रोजी सायन रुग्णालयात कोरोनाची तपासणी केली होती. त्याचा अहवाल मिळाला नसलातरी कोरोना झाल्याच्या शक्यतेमुळे ते चिंतेत व अस्वस्थ होते. पहाटे पाचच्या  सुमारास घरातील मंडळीना ते बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले.  तातडीने त्यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ५७ वर्षीय पोलीस हवालदार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते विक्रोळी पूर्व टागोर नगर येथे राहण्यास होते. तसेच मागील आठ दिवसापासून सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे बुधवारी निधन झाले. पार्क साईट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक कल्पना पवार यांनी त्यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. तसेच वाहतूक विभागतील पोलिसाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 

 

 

शिवसेना नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून हत्या; संतप्त कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड

 

तक्रारदार तरुणीचा विनयभंग; पोलीस उपनिरीक्षकाला अटक

 

खाकीला काळिमा! तक्रार दाखल करण्यास आलेल्या युवतीचा पोलीस अधिकाऱ्याने केला विनयभंग 

 

Coronavirus : मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का, दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू  

 

शेजारणीवर जीव जडला; पत्नीसह जन्मदात्यांचा 8 लाखांची सुपारी देऊन काढला काटा

Web Title: Coronavirus: Another Mumbai policeman died due to coronavirus pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.