लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबईतील ४०० वर्षे जुना व ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी झाली. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांनी शेलार यांच्यावर टीका करत भाजपचा दुतोंडीपणा योग्य नसल्याचे म्हटले आहे, तर शेलार यांनी या प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले.
वांद्रे किल्यावरील दारू पार्टीचा प्रकार उद्धवसेनेचे अखिल चित्रे यांनी उघडकीस आणला होता. ऐतिहासिक किल्ल्यात अशा पार्ट्यांचे आयोजन कसे झाले? मंत्री शेलार यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम झाल्याने ४८ तास उलटले तरी कुणावर कारवाई का झाली नाही हे आता समजले, असा टोला त्यांनी लगावला.
मतदारसंघातील कार्यक्रम असल्याने तिथे गेलो होतो. कार्यक्रमाला मतदारसंघातील लोकांनी आणि पर्यटन विभागाने सहकार्य केले. परवानगी कार्यक्रमाला होती मात्र, दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करून तिथे कुणी मद्य विक्री केली असेल तर त्याच्या चौकशीचे व दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.- आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री
Web Summary : A liquor party at Bandra Fort, attended by Minister Ashish Shelar, ignited a political row. Congress criticized Shelar, accusing BJP of hypocrisy. Shelar ordered an investigation and action if permit abused with alcohol sales.
Web Summary : बांद्रा किले में शराब पार्टी, जिसमें मंत्री आशीष शेलार शामिल हुए, से राजनीतिक विवाद हुआ। कांग्रेस ने शेलार की आलोचना करते हुए भाजपा पर पाखंड का आरोप लगाया। शेलार ने शराब बिक्री के दुरुपयोग की जांच का आदेश दिया।