Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता पाहतेय; नाना पटोलेंचा चव्हाणांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 15:12 IST

भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Nana Patole On Ashok Chavan ( Marathi News ) :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वासह काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला धक्का बसल्याचं बोललं जात असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत चव्हाण यांच्यासह भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे, असं पटोले म्हणाले.

अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत नाना पटोले म्हणाले की, "काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू," असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

काँग्रेस सोडताना अशोक चव्हाण काय म्हणाले?

नाना पटोले यांना पत्र लिहीत अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की, "मी दिनांक १२-०२-२०१४ मध्यान्हपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करत आहे." 

टॅग्स :अशोक चव्हाणनाना पटोलेकाँग्रेसभाजपा