शपथविधीची तुलना, 'पळून जाऊन केलेलं लग्न अन् थाटामाटात केलेला सोहळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 05:00 PM2019-11-29T17:00:10+5:302019-11-29T17:02:19+5:30

ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला

Comparison of Swearing ceremoney, devendra fadanvis and uddhav thackeray viral photos | शपथविधीची तुलना, 'पळून जाऊन केलेलं लग्न अन् थाटामाटात केलेला सोहळा'

शपथविधीची तुलना, 'पळून जाऊन केलेलं लग्न अन् थाटामाटात केलेला सोहळा'

Next

राज्याचे २९ वे मुख्यंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, नेते दिवाकर रावते, डॉ. निलम गोऱ्हे यांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की.... हा खणखणीत आवाज शिवाजी पार्कच्या आसमंतात घुमला आणि जमलेल्या लाखो लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि गगनभेदी घोषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी समारंभ डोळ्यात साठवला. 

ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, त्याच ठिकाणी त्यांचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने गुरुवारी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अवघा महाराष्ट्र हा सोहळा पाहण्यासाठी आतुर झालेला पाहायला मिळाला. सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरेंनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिकांनी जल्लोष केला. फटक्यांची आतषबाजी, शिवसैनिकां उत्साह आणि मिठाईवाटप जणू एखाद्या ग्रँड लग्नसोहळ्याप्रमाणेच पाहायला मिळाले. या सोहळा देशभरात लाईव्हा पाहण्यात आला. त्यामुळे या ग्रँड शपथविधी सोहळ्याचे सर्वत्र कौतुकही होत आहे. सोशल मीडियावरुनही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना शुभेच्छा... देण्यात आल्या. तर, अनेकांनी या सोहळ्याची तुलना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासोबत केली. 

देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी-सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रासह देशासाठी हा धक्कादायक क्षण होता. कारण, या शपथविधी सोहळ्याची पुसटशीही कल्पना सर्वसामान्य जनतेला आणि पक्षातील अन्य नेत्यांना नव्हती. त्यामुळे, हा शपथविधी सोहळा टीकेचं धनी बनला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं कौतुक झालं, अभिनंदन आणि शुभेच्छाही मिळाल्या. पण, असा घाई-गडबडीत शपथविधी महाराष्ट्राच्या जनतेला रुचला नव्हता. त्यामुळेच, उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या 2019 मधील शपथविधी सोहळ्याची तुलना केली जात आहे. या सोहळ्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करण्यात येतंय. तर, काहीजण पळून जाऊन केलेलं लग्न अन् थाटामाटात केलेलं लग्न... असं म्हणत फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याची खिल्ली उडवत आहेत. तसेच, लोकं झोपेत असताना नाही, तर लोक आवर्जून पाहतील असा #शपथविधी...! असंही या शपथविधी सोहळ्याचं कौतुक केलं जातंय.  

 
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात आले होते.

Web Title: Comparison of Swearing ceremoney, devendra fadanvis and uddhav thackeray viral photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.