राज्यात महिलांवरील अत्याचारांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 04:13 PM2019-12-10T16:13:35+5:302019-12-10T16:14:19+5:30

महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे.

CM Uddhav Thackeray orders immediate action against violence against women in state | राज्यात महिलांवरील अत्याचारांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यात महिलांवरील अत्याचारांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Next

मुंबई - राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

 मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

महिलांवरील अत्याचारुबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे.

निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा
गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. हा निधी तात्काळ कशा पद्धतीने त्याचा त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
 

Web Title: CM Uddhav Thackeray orders immediate action against violence against women in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.