जे केले ते आम्हीच केले म्हणण्याची नवी साथ आलीय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 06:50 PM2022-04-02T18:50:11+5:302022-04-02T18:50:28+5:30

आरडाओरड करणाऱ्यांनी श्रेय घ्यायचं आहे. खुशाल घ्या. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी आग्रह धरला जात आहे. अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचा उपयोग का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे.

CM Uddhav Thackeray Criticised BJP In Metro Inauguration ceremony | जे केले ते आम्हीच केले म्हणण्याची नवी साथ आलीय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

जे केले ते आम्हीच केले म्हणण्याची नवी साथ आलीय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Next

मुंबई – मुंबई शहरात झपाट्याने लोकसंख्या वाढतेय. माझा जन्म मुंबईत झालाय. गेली ५ दशकं मी बदललेली मुंबई पाहतोय. लहान असताना ट्राम्प पाहिली होती. त्यानंतर बेस्ट आली, मोनो, मेट्रो आली. रेल्वेत उतरताना दरवाजात फक्त उभं राहिले तरी आपोआप आत जातो आणि बाहेर पडतो. गर्दी एवढी वाढली त्यात सुविधा देणार तरी किती? मुंबईत अनेक प्रकल्पाचं भूमिपूजन होते. जलपूजन होते परंतु प्रकल्पाचं पुढे काय होत नाही? जे काही केले आम्हीच केले अशी नवी साथ आलीय. मळमळ होतेय अशा रुग्णांकडे लक्ष देण्याची गरज नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी भाजपाला(BJP) टोला लगावला आहे. मेट्रो २ अ, मेट्रो ७ मार्गाच्या उद्धाटनावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही काय करतो, तुम्ही काय करते हे जनता पाहते. कौरवांचे चाळे न बघू शकणारा हा धुतराष्ट्राचा महाराष्ट्र नाही. रातोरात झाडांची कत्तल केलीय होय आम्ही पाहिलंय, झाडांची कत्तल करून विकास करायचा नाही. हॉस्पिटलमध्ये न जाण्याची वेळ येऊ नये याला म्हणतात विकास. पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता सुविधा देणे हा विकास आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण करून दाखवतो. आरडाओरड करणाऱ्यांनी श्रेय घ्यायचं आहे. खुशाल घ्या. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी आग्रह धरला जात आहे. अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचा उपयोग का? आर्थिक केंद्र बनवण्याची जागा बुलेट ट्रेनसाठी दिली जातेय. कांजूरची ओसाड पडलेली जमीन तुम्ही का दिली नाही? मुंबईच्या पंपिंग स्टेशनसाठी जागा मागतोय ती द्यायला तयार नाही. अनेक प्रकल्प अडकून राहिलेत ते मार्गी लावा असं त्यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्र देशाचा आर्थिक कणा आहे तो कायम ठेवा. मुंबईला केंद्राकडून काय मिळते? आम्ही आमच्या हक्काचं मागतो भीक मागत नाही. वेळ पडल्यास लढाईला मागेपुढे पाहणार नाही गुण्यागोविंदाने काम सुरू आहे. तुम्ही काम सुरू केले. ते पुढे नेण्याचं काम आम्हीच करतोय. मुंबई आणि नागपूर बुलेट ट्रेन करायची होती. त्याचा उपयोग महाराष्ट्राला झाला असता. आरोप-प्रत्यारोपात जनतेला काय मिळालं याचा विचार व्हायला हवा. महागाईपासून जनतेचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा लोकांपासून सावध राहायला हवा असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Web Title: CM Uddhav Thackeray Criticised BJP In Metro Inauguration ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.