चेंबूरमध्ये तरुणांकडून ३७ वाहनांची तोडफोड

By Admin | Updated: September 30, 2015 00:47 IST2015-09-30T00:47:18+5:302015-09-30T00:47:18+5:30

नशेच्या धुंदीत काही तरुणांनी रस्त्यालगत पार्क केलेल्या ३७ वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री चेंबूरच्या रामटेकडी परिसरात घडली

In Chembur, 37 vehicles were smuggled by youth | चेंबूरमध्ये तरुणांकडून ३७ वाहनांची तोडफोड

चेंबूरमध्ये तरुणांकडून ३७ वाहनांची तोडफोड

मुंबई : नशेच्या धुंदीत काही तरुणांनी रस्त्यालगत पार्क केलेल्या ३७ वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री चेंबूरच्या रामटेकडी परिसरात घडली. याबाबत वाहन चालकांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चेंबूर कॅम्प परिसरातील रामटेकडी भागात राहणारे रहिवासी येथील गुरुद्वारा परिसरात वाहने नेहमीच उभी करतात. सोमवारीदेखील परिसरातील रहिवाशांनी त्यांची वाहने नेहमीप्रमाणे रस्त्यालगत पार्क केली होती. मात्र मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी काठ्या आणि तलवारींच्या साह्याने या वाहनांवर हल्ला चढवला.
या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे.
काचा फोडण्यात आलेल्या वाहनांमध्ये
रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, दुचाकी आणि
काही खासगी वाहनांचा समावेश आहे. आज सकाळी परिसरातील रहिवाशांना ही बाब समजताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी ही बाब आरसीएफ पोलिसांना सांगितली.
त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पाहणी करत अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल
केला आहे. तसेच पोलिसांनी गुरुद्वारा परिसरात लागलेले काही सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले
असून त्याआधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: In Chembur, 37 vehicles were smuggled by youth