सनदी अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर नियुक्ती नको; विधान परिषदेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 01:45 AM2020-03-12T01:45:33+5:302020-03-12T01:45:42+5:30

इतर कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा

Charity officers do not want retirement; Demand at Legislative Council | सनदी अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर नियुक्ती नको; विधान परिषदेत मागणी

सनदी अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर नियुक्ती नको; विधान परिषदेत मागणी

Next

मुंबई : निवृत्तीनंतरही अनेक वरिष्ठ सनदी अधिकाºयांची कंत्राटी पद्धतीने शासकीय सेवेत नेमणूक होते. या अधिकाºयांचे पगार, भत्ते आणि निवासासह इतर सोयीसुविधांवर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतो. शिवाय, सेवेतील अधिकारी आणि कर्मचाºयांचा हक्कच एक प्रकारे हिरावला जातो. त्यामुळे अशा नेमणुका रद्द कराव्यात अशी आग्रही मागणी विधान परिषद सदस्यांनी बुधवारी सभागृहात लावून धरली.

जोगेंद्र कवाडे यांनी निवृत्त अधिकाºयांची कंत्राटी पद्धतीने पुर्ननियुक्ती होत असल्याबाबत प्रश्न विचारला होता. तर, म्हाडा आणि गृहनिर्माण विभागातील अनेक निवृत्त अधिकारी खासगी विकासकाकडे काम करत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

यावर अशा अधिकाºयांची माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे आश्वासन सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. गट अ आणि गट ब वर्गातील साधारण ६५ ते ७० वयापर्यंतच्या अधिकाºयांना निवृत्तीनंतर कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतले आहे. परंतु अशा अधिकाºयांच्या पगारातून निवृत्ती वेतनाची रक्कम वगळण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली.

७२ हजार पदांची मेगाभरती
राज्य सरकारी सेवेतील ७ लाख ३६ हजार पदे मंजूर आहे. या मंजूर पदांपैकी ५ लाख ८५ पदे भरण्यात आली, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच लवकरात लवकर ७२ हजार पदांची मेगाभरतीचा सरकाराचा प्रयत्न असल्याचही त्यांनी सांगितले.

आणखी आठ सनदी अधिकाºयांची बदली
राज्य शासनाने बुधवारी आठ सनदी अधिकाºयांची बदली केली. ग्रामविकास विभागाचे उपसचिव अरिबम शर्मा हे हिंगोली जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. अश्विन मुदगल यांची नियुक्ती सिडको; नवी मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली. पी.सिवा संकर हे राज्य वखार महामंडळ; पुणेचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील. सुनील चव्हाण यांची बदली राज्य वीज वितरण कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक (औरंगाबाद) या पदावर करण्यात आली. श्वेता सिंघल यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, पुणेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे या आता यशदा, पुणेच्या उपमहासंचालकपदी करण्यात आली आहे. आर. एस. जगताप यांची नियुक्ती सह आयुक्त. विक्रीकर, औरंगाबाद या रिक्त पदावर तर ए. ए. गुल्हाणे यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य, (२) नवी मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली.

Web Title: Charity officers do not want retirement; Demand at Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.