सीईटीच्या चार हजार विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट डाऊनलोड न केल्याचे उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 02:15 IST2019-05-16T02:15:08+5:302019-05-16T02:15:22+5:30
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत २७ हजार १०४ एवढी घटली आहे.

सीईटीच्या चार हजार विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट डाऊनलोड न केल्याचे उघड
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत २७ हजार १०४ एवढी घटली आहे. गतवर्षी ४ लाख १९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी आॅफलाइन पद्धतीने ही परीक्षा दिली होती. यंदा आॅनलाइन पद्धतीने ३ लाख ९२ हजार ३०४ विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी दिल्याचे राज्य सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच एकूण ४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी हॉलतिकीटच डाऊनलोड केले नसल्याचे सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात राज्य सीईटी सेलने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करून एमएचटी-सीईटी देणाºया विद्यार्थ्यांची आकडेवारी प्रसिद्ध केली. ही परीक्षा २ ते १३ मे रोजी यंदा प्रथमच आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
१० दिवस चाललेल्या या परीक्षेस उपस्थित विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.९४ टक्के एवढी होती. ५.०६ टक्के विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती सीईटी सेलने दिली. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या जवळपास ४ लाख १३ हजार विद्यार्थ्यांपैकी चार हजार विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट डाऊनलोड केले नाही.
राज्य सीईटी सेलकडून पहिल्यांदाच होणाºया या आॅनलाइन परीक्षेचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. तसेच आॅनलाइन परीक्षेची भीती वाटू नये, यासाठी ठिकठिकाणी सराव परीक्षेची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला होता. या सीईटीचा निकाल ४ जून २०१९ रोजी जाहीर होणार असल्याचे राज्य सीईटी सेलमार्फत कळविण्यात आले आहे.
आॅनलाइन परीक्षेचे पहिले वर्ष