जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:06 IST2025-07-18T13:55:49+5:302025-07-18T14:06:26+5:30

Jitendra Awhad News: कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असताना पोलिसांचं वाहन अडवल्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Case registered against Jitendra Awhad, case registered at Marine Drive police station | जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा

गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप आणि वाकयुद्धाचं पर्यावसान विधिमंडळाच्या आवारातच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होण्यामध्ये झालं होतं. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असताना पोलिसांचं वाहन अडवल्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाज यांनी परवा विधिमंडळाच्या आवारात एकमेकांना डिवचलं होतं. त्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली असतानाच काल जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळ परिसरामध्येच धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीमध्ये सहभागी असलेले जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आले असताना आव्हाड यांनी पोलिसांच्या कारसमोर झोकून देत अटकेला विरोध केला होता.

त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना उचलून तिथून बाजूला केले होते. तसेच नितीन देशमुख यांला पोलीस ठाण्यात नेले होते. दरम्यान, आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड हे विद्यमान आमदार असल्याने विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने त्यांच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. 

Web Title: Case registered against Jitendra Awhad, case registered at Marine Drive police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.