सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पेट्रोल चोरटे कैद

By Admin | Updated: March 4, 2015 23:15 IST2015-03-04T23:15:17+5:302015-03-04T23:15:17+5:30

तुर्भे स्टोअर परिसरात वाहनांमधून पेट्रोल चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्याच परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

Capture petrol thieves in CCTV cameras | सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पेट्रोल चोरटे कैद

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पेट्रोल चोरटे कैद

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर परिसरात वाहनांमधून पेट्रोल चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्याच परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मंगळवारी रात्री एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला आहे.
तुर्भे स्टोअर येथे राहणाऱ्या सनी पांडे या तरुणाच्या मोटरसायकलमधील पेट्रोल मंगळवारी मध्यरात्री चोरीला गेले. सकाळी ही बाब त्याच्या निदर्शनास आली असता त्याने घरासमोर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती मोटरसायकलमधून पेट्रोलची चोरी करताना दिसली. त्यानुसार पांडे याने तुर्भे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. याच परिसरात यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. त्यावरून तेथे वाहनांमधून पेट्रोलची चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Capture petrol thieves in CCTV cameras