उमेदवारांमध्ये रंगले आहे सोशल वॉर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 01:51 IST2019-04-26T01:50:58+5:302019-04-26T01:51:33+5:30
व्हिडीओ, छायाचित्रांनी उडविली धमाल; शिवसेना-काँग्रेसचा एकमेकांवर पलटवार

उमेदवारांमध्ये रंगले आहे सोशल वॉर
मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रचार सोशल मिडियावरुन जास्त गाजला. काँग्रेसचे मिलिंद देवरा सोशल मिडियावर पूर्वीपासून सक्रिय आहेत. मात्र शिवसेनेचे अरविंद सावंत यांनीही आघाडी घेत हम भी कुछ कम नही, असे दाखवून दिले. दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धीविरोधात सोशल मोहिम उघडून आरोप-प्रत्यारोप सुरु ठेवले.
सावंत यांनी आपल्यावरील गुन्हा जाहीर करावे असे आवाहन देवरा यांनी केले. त्यास सावंत यांनी निवडणूक आयोगाची देवरा यांना मिळालेली नोटीस, त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा याबाबत अपडेट करुन मतदारांपर्यंत पोहोचवली. देवरा यांचे तब्बल ११ लाख फॉलोअर्स आहेत. तर अरविंद सावंत यांचे २५ हजार फॉलोअर्स आहेत.
दोन्ही उमेदवारांमध्ये सुरु असलेला सोशल वाद दिवसेंदिवस आणखी रंगत येत असून आरोप-प्रत्यरोपांनी धमाल उडवून दिली आहे. देशाचे श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांच्या देवरा यांना पाठिंब्याच्या व्हिडिओने सोशल मिडियावर खळबळ उडवून दिली होती. तर मराठी मतदारांना वळविण्यासाठी देवरा यांनी काढलेला व्हिडिओही गाजत आहे.
काँग्रेस-मिलिंद देवरा
फेसबुक 111680 पेज लाईक्स
170 पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट
टिष्ट्वटर 1070000 फॉलोअर्स
285 पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट
कोणत्या मुद्द्यांवर भर
गिरणी कामगार, व्यापारी, बेरोजगार आणि झोपडपट्टीधारकांना न्याय मिळवून देणार.
जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविणे, अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल असणे असे आरोप गाजले.
शिवसेना-अरविंद सावंत
फेसबुक 89881 पेज लाईक्स
155 पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट
टिष्ट्वटर 25200 फॉलोअर्स
250 पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट
कोणत्या मुद्द्यांवर भर
मिलिंद देवरा यांना निवडणूक आयोगाची नोटीस, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे याची सोशल मिडियावरुन प्रसिद्धी
मुंबई पोर्ट ट्रस्ट, गिरणी कामगार, भाडेकरु यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.