BMC Nominated Corporator: अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 06:16 IST2026-02-26T06:15:52+5:302026-02-26T06:16:44+5:30

BMC 10 Nominated Corporators List: महापौरांनी भाजपचे ४, उद्धवसेना ३, शिंदेसेना २, काँग्रेसच्या एका स्वीकृत सदस्याच्या नावाची घोषणा केली.

BMC Nominated Corporators: Finally, the MLA's close aides along with their sons have been 'approved', whose name has been chosen by the BJP? | BMC Nominated Corporator: अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी?

BMC Nominated Corporator: अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी?

मुंबई : पालिका सभागृहात बुधवारी महापौर रितू तावडे यांनी १० स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा केली. त्यामुळे काही आमदार पुत्रांसह, काही नेत्यांच्या निकटवर्तीयांना नगरसेवक बनण्याची संधी मिळाली.

महापौरांनी भाजपचे ४, उद्धवसेना ३, शिंदेसेना २, काँग्रेसच्या एका स्वीकृत सदस्याच्या नावाची घोषणा केली. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वीकृत नगरसेवकांची संख्या १० झाली. पूर्वी ही संख्या ५ होती. 

निवडून आलेले २२७ व १० स्वीकृत सदस्यांमुळे नगरसेवकांची संख्या २३७ झाली आहे. भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा होताच सभागृहात भाजप नगरसेवकांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या.

पक्षनिहाय यांना मिळाली संधी

भाजप : मूळचे भाजपचेच, पण मधल्या काळात काँग्रेस पक्षात गेलेले, मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले त्यानंतर पुन्हा भाजपवासी झालेले प्रवीण छेडा, भाजप आमदार राजहंस सिंह यांचे पुत्र डॉ. नितेश सिंह, प्रतीप करपे, कमलाकर

उद्धवसेना : साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक.

शिंदेसेना: आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे आणि उमेश माने.

काँग्रेस : आमदार अस्लम शेख यांचे निकटवर्तीय वीरेंद्र चौधरी.

Web Title : बीएमसी ने मनोनीत पार्षद: विधायक पुत्रों और रिश्तेदारों को सीटें मिलीं

Web Summary : बीएमसी ने 10 पार्षदों को मनोनीत किया, जिनमें विधायक पुत्र और रिश्तेदार शामिल हैं। भाजपा को 4, उद्धव सेना को 3, शिंदे सेना को 2 और कांग्रेस को 1 सीट मिली। पार्षदों की कुल संख्या 237 हुई।

Web Title : BMC Nominates Corporators: Relatives and Sons of MLAs Get Seats

Web Summary : BMC nominated 10 corporators, including relatives and sons of MLAs. BJP got 4, Uddhav Sena 3, Shinde Sena 2, and Congress 1. The total number of corporators increased to 237.