"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 22:56 IST2026-01-11T22:32:03+5:302026-01-11T22:56:53+5:30
शिवाजी पार्क येथील सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.

"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
"७० हजार कोटींचे आरोप तुम्ही आणि मोदींनी केले, ढिगभर पुरावे दिले. केस चालू आहेत म्हणताय, पुरावे तुम्ही दिले ते पुरावे की जाळावे कोर्टाने सांगावं. तुम्हाला माहीत आहे पुरावे दिले, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. नसेल तर अजित पवारांची माफी मागा, हेच तुमचे चाळे चालू आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली. आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. यावेळी ठाकरेंनी भाजपावर टीका केली.
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे. काश्मीरमध्ये माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला. त्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला, ऑपरेशन सिंदूर केलं, आणि काही दिवसांनी याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला शहांचे चिरंजीव पुढे, हे यांचं देशप्रेम?
उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग फडणवीस अंबरनाथमध्ये तुम्ही असं काय सोडलं? ईदच्या दिवशी मोदींना लहानपणी मुस्लिम कुटुंबाकडून जेवण यायचं. सौगात ए मोदी केली तरी चालतं. आम्ही साधं अमर शेखचं नाव घेतलं तर आम्ही हिंदूत्व सोडलं? तुम्ही जे करताय ते काय अमरप्रेम आहे का?, असा सवालही ठाकरेंनी केला.
राज ठाकरेंनी व्हिडीओ दाखवत केली टीका
मुंबई महानगपालिका निवडणुकीतील प्रचारामध्ये सर्वांचं लक्ष लागलेली ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवतीर्थावर सुरू झाली आहे. तसेच या सभेमधून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ अंदाज दाखवला. तसेच यामधून राज ठाकरे यांनी पहिला घाव उद्योगपती अदानी यांच्यावर घातला. २०१४ साली केंद्रात मोदी सत्तेवर आल्यापासून उद्योगपती गौतम अदानी यांच्या झालेल्या प्रगतीचा आलेख दाखवत या माध्यमातून भाजपाचा मुंबई तोडण्याचा डाव कसा आखला जातोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे म्हणाले की, २०२४ साली मला एक व्यक्ती भेटली. त्याने मला जी माहिती दिली. तसेच ती माहिती दिल्यानंतर माझी माणसं माझी रिसर्ज टीम कामाला लागली. त्यामधून जी काही माहिती समोर आली ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तसेच मी आज जे दाखवणार आहे ते पाहून समजा तुम्हाला भीती नाही वाटली, तर मला असं वाटतं की या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या.