मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 19:18 IST2025-05-27T19:17:59+5:302025-05-27T19:18:59+5:30

Mumbai Water Cut: मध्य आणि दक्षिण मुंबईत उद्यापासून २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

BMC Announces 24 Hour Water Cut On May 28–29 In South And Central Mumbai For Major Pipeline Work | मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई महानगरपालिकेने पाणीपुरवठा योग्य आणि सुरळीत करण्यासाठी विविध कामे हाती घेतल्याने मध्य आणि दक्षिण मुंबईत उद्यापासून २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने आवाहन केले आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १०.००  ते गुरुवारी सकाळी १०.००  या कालावधीत 'ए', 'बी', 'ई' आणि 'एफ दक्षिण' विभागांतील काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार

ए विभाग: नेव्हल डॉकयार्ड परिक्षेत्र- सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डि'मेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी रिझर्व्ह बँक (आर. बी. आय.), नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, मुख्य टपाल कार्यालय (जी. पी. ओ.) जंक्शन पासून रिगल चित्रपटगृहापर्यंत (२८ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील)

बी विभाग: बाबूला टँक परिक्षेत्र मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चेंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग, पीरु गल्ली, नारायण धुरु, अब्दुर रहेमान मार्ग, नाकोडा, कोलसा (२९ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील) डोंगरी 'ब' येथील परिक्षेत्र तांडेल, टनटनपूर, मोहम्मद उमर कोकील मार्ग, वाय. एम. मार्ग, खडक, इजराईल मोहल्ला, व्ही. व्ही. चंदन, दर्यास्थान, धोबी शेरीफ देवजी, रघुनाथ महाराज, ओल्ड बंगालीपुरा भंडारी, आचार्य चंद गांधी मार्ग, निशाणपाडा, मशीद बंदर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एल. टी. टी.) मार्ग, नूरबाग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल स्ट्रीट, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा स्ट्रीट (२९ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील) डोंगरी 'अ' परिक्षेत्रातील उमरखाडी, नूरबाग चिंचबंदर, कारागृह मार्ग, वालपाखाडी, आनंदराव सुर्वे मार्ग, माहेश्वरी मार्ग, केशवजी नाईक, निशाणपाडा पथ, पॅल्क मार्ग, नौरोजी हिल तांडेल, समंथाभाई नानजी मार्ग, रामचंद्र भट मार्ग, समताभाई नानजी मार्ग, शायदा मार्ग, नूरबाग आणि डॉ. महेश्वरी मार्ग, संपूर्ण मुंबई पोर्ट ट्रस्ट (बी. पी. टी.) परिक्षेत्र, पी. डि'मेलो मार्ग, मध्य रेल्वे रेल्वे यार्ड.

ई विभाग: ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिजुद्दीन मार्ग, गणेश हरी पारुंडेकर मार्ग, पाईस स्ट्रीट, मुसा किल्लेदार स्ट्रीट, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर मार्ग, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम), बी. जे. मार्ग, के. के. मार्ग (२९ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील) मुंबई सेंट्रल भागातील एम. एस. अली मार्ग, बेलासिस मार्ग, कामाठीपुरा, एस. पी. मार्ग, शुक्लाजी स्ट्रीट, मनाजी राजूजी मार्ग, आग्रीपाडा (२९ मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल) डिमटिमकर मार्ग, उंद्रिया स्ट्रीट, खांडिया स्ट्रीट, टेमकर स्ट्रीट, शेख कमरुद्दीन स्ट्रीट, मस्तान टँक मार्ग, टँक स्ट्रीट, काझिपुरा, डंकन मार्ग, जे. जे. मार्ग.

एफ दक्षिण: दत्ताराम लाड मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भाई बाल मुकुंद मार्ग, काळाचौकी, चिंचपोकळी, टी. बी. कदम मार्ग (२९ मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा राहील) म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबीट मार्ग, ताडवाडी रेल्वे कुंपण, शिवदास चापसी मार्ग (२९ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील) माझगाव कोळीवाडा, नरसू नाखवा मार्ग, ब्रम्हदेव खोट मार्ग, दर्गा गल्ली, हॉस्पिटल गल्ली, चर्च गल्ली, बेकर गल्ली, नवाब टँक पूल, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, कासार गल्ली, लोहारखाता, कोपरस्मीथ मार्ग (२८ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील) हातीबाग, शेठ मोतिशहा गल्ली, डी. एन. सिंग मार्ग (२८ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील) जे.जे. रुग्णालय (कमी दाबाने पाणीपुरवठा राहील) रामभाऊ भोगले मार्ग, फेरबंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणी बाग), घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा (पूर्व), शेठ मोतिशहा गल्ली, टी. बी. कदम मार्ग, संत सावता मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. म्हस्कारहन्स मार्ग, डी. पी. वाडी, काळाचौकी, नारियलवाडी, संत सावता मार्ग, चापसी भीमजी मार्ग.

Web Title: BMC Announces 24 Hour Water Cut On May 28–29 In South And Central Mumbai For Major Pipeline Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.