भाजपचे मुंबईत सहा डिजिटल प्रचार रथ; केंद्राच्या विकासकामांची माहिती देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 06:13 IST2024-03-10T06:12:47+5:302024-03-10T06:13:00+5:30
दादर येथील मुंबई भाजप कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

भाजपचे मुंबईत सहा डिजिटल प्रचार रथ; केंद्राच्या विकासकामांची माहिती देणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्या हस्ते शनिवारी सहा डिजिटल प्रचार रथाला झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. दादर येथील मुंबई भाजप कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
प्रचार रथाच्या माध्यमातून मुंबईतील सहाही लोकसभा क्षेत्रातील मुंबईकरांपर्यंत विकासकामांची माहिती पोहोचवली जाणार आहे. यावेळी आ. प्रसाद लाड, सरचिटणीस संजय उपाध्याय, सर्व नगरसेवक, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
२०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याचे शंभरावे वर्ष पूर्ण करेल त्यावेळी भारत अविकसित किंवा विकसनशील नसेल तर विकसित देश असेल. हे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत यात्रा सुरू आहे, असे शेलार यावेळी म्हणाले. भाजपने पाच वर्ष प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली आहे म्हणूनच ‘अबकी बार चारसो पार’ असे आम्ही आत्मविश्वासाने म्हणत आहोत, असेही ते म्हणाले.