Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कंगना राणौत झाशीची राणी आहे; तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 17:17 IST

भाजपाचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उघडपणे बोलणारी अभिनेत्री कंगना राणौतने  मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. यानंतर कंगनानंही संजय राऊत यांनी 'मला मुंबईत न येण्याची धमकी दिल्याचा,' गंभीर आरोप केला आहे. यावरुनच भाजपानं पुन्हा एकदा संजय राऊत यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. 

संजय राऊत यांनी मला जाहीर धमकी दिली असून पुन्हा मुंबईत येऊ नकोस, असं धमकावलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आजादी ग्रॅफिटी आणि आता ही जाहिर धमकी, मला मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे, असं ट्विट कंगनाने केलं आहे. यावर भाजपाचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

...तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील; उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा आवाहन

शिवसेना नेत्यानं पुन्हा एकदा निंदनीय विधान केलं आहे. महाविकास आघाडीनं मुंबई पोलिसांवर स्वतःच्या स्वार्थासाठी दबाव आणला आहे. जेणेकरून सुशांतला न्याय मिळू नये. त्यांचा उद्देशच बॉलिवूड ड्रग माफियांना संरक्षण देण्याचा आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. तसेच कंगना राणौत झाशीची राणी आहे. जी या धमक्यांना घाबरत नाही,' असं देखील राम कदम यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललंय, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर तातडीने उत्तर दिलं पाहिजे, मग ते कोणीही असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले होते.

मला अनफॉलो का केलं जातय?- कंगना रणौत

माझे ट्विटर फॉलोअर्स गेल्या दिवसांत अचानक कमी होत आहेत. यामध्ये एक पॅटर्न असल्याचा संशय मला येतोय. दिवसाला 40 ते 50 हजार फॉलोअर्स कमी होत आहेत. मी ट्विटरवर नवीन आहे. यामागचे कारण मला माहित नाही. हे असे का होतेय कोणी सांगेल का? ते असे का करत आहेत, काही कल्पना आहे का? अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे. या ट्विटमध्ये तिने ट्विटर इंडियाला देखील टॅग केले आहे.  

अन्य महत्वाच्या बातम्या- 

'उद्धव ठाकरेंना सगळं बंद करण्याची हौस नाही'; शिवसेनेचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

'भारताने आपली चूक सुधारावी'; पबजीसह ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनची प्रतिक्रिया

शिवसेनेनं घात केला, आरेमध्येच मेट्रो कारशेड उभारण्याचा डाव; काँग्रेस नेत्याचा आरोप

टॅग्स :संजय राऊतराम कदमशिवसेनाकंगना राणौतबॉलिवूडभाजपामहाराष्ट्र सरकारसुशांत सिंग रजपूत