bjp leader chitra wagh once again received a threatening phone call | दारु पिऊन शिव्या देण्यात कसला पुरुषार्थ?; चित्रा वाघ संतापल्या, पुन्हा धमक्यांचे फोन

दारु पिऊन शिव्या देण्यात कसला पुरुषार्थ?; चित्रा वाघ संतापल्या, पुन्हा धमक्यांचे फोन

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड (sanjay rathod) यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द चित्रा वाघ यांनीच याबाबतचं ट्विट केलं आहे. (bjp leader chitra wagh once again received a threatening phone call)

"दारू पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का? FIR होऊनही परिस्थितीत फरक पडला नाही", असं ट्विट चित्रा वाघ यांनी बुधवारी रात्री केलं आहे. 

चित्रा वाघ यांनी या ट्विटसोबतच एका जुन्या घटनेची आठवण करुन देणारा प्रसंग देखील ट्विट केला आहे. "मला आठवतंय मागे माझ्या दहिसरच्या मैत्रिणीचा मोबाइल नंबर टॉयलेटमध्ये तर कलिनाच्या मैत्रिणीचा नंबर ट्रेनमध्ये लिहीला गेला होता. त्यावेळी त्यांना काय व कसे फोन करुन त्रास दिला गेला ज्याची मी साक्षीदार आहे. लढलेली तेव्हाही. त्यांचा लढासुद्धा प्रस्थापितांविरोधातच होता...लडेंगे...जितेंगे", असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. 

दरम्यान, चित्रा वाघ यांना याआधीही पूजा चव्हाण प्रकरणात जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन आले होते. धमक्यांना अजिबात घाबरत नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp leader chitra wagh once again received a threatening phone call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.