Join us

मोठी बातमी: एकनाथ शिंदे उद्या शिवसेनेच्या १० उमेदवारांची यादी जाहीर करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 20:25 IST

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या १३ खासदारांनी साथ दिली होती.

Shivsena Eknath Shinde ( Marathi News ) : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असून याबाबतच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीत वेगवान हालचाली सुरू आहेत. मात्र जागावाटप निश्चित होण्याआधीच भाजपने आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १० उमेदवारांची नावे उद्या जाहीर करतील, अशी माहिती आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या १३ खासदारांनी साथ दिली होती. या सर्व खासदारांना पुन्हा तिकीट मिळावं, यासाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही आहेत. मात्र काही जागांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने एकनाथ शिंदे हे उद्या १० उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित उमेदवारांची नावे घोषित केली जातील, अशी माहिती आहे.

...तर भाजपच्या वाट्याला २९ जागा

१३ जागा तर आपल्याला मिळायलाच हव्यात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी सहापेक्षा कमी जागा घ्यायला तयार नाही. एकूण १९ जागा मित्रपक्षांना दिल्या तर भाजपच्या वाट्याला २९ जागा येतील. भाजपचे राज्यातील नेते त्यासाठी राजी नाहीत. त्यामुळे आता चेंडू भाजपश्रेष्ठींच्या कोर्टात गेला आहे. सूत्रांनी सांगितले की, शिवसेनेकडील दोन मतदारसंघात नवीन चेहरा द्यावा अशी सूचना भाजपने केली आहे. भाजपच्या बाबतीत राष्ट्रवादी व शिवसेनेकडून एकेका मतदारसंघाबाबत तशी सूचना करण्यात आली आहे.

या जागांचा आहे तिढा

- भंडारा-गोंदिया : भाजपला आणि राष्ट्रवादीलाही हवी- सातारा : भाजप आणि राष्ट्रवादीची रस्सीखेच- ठाणे : भाजपबरोबरच शिवसेनेलाही हवाय - रामटेक : भाजपला इच्छा, शिवसेनाही अडली- यवतमाळ-वाशिम : भाजप म्हणतो आम्हाला द्या- गडचिरोली : भाजपचा मतदारसंघ, राष्ट्रवादीचाही हट्ट- उत्तर-पश्चिम मुंबई : शिवसेनेची जागा, भाजपचा दावा- दक्षिण मुंबई : भाजप-सेनेत रस्सीखेच, मनसेची शक्यता- औरंगाबाद : शिवसेना आग्रही व भाजपही अडून बसला- कोल्हापूर : शिवसेना आणि भाजप या दोघांचाही दावा

टॅग्स :एकनाथ शिंदेलोकसभा निवडणूक २०२४उद्धव ठाकरेभाजपा