Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अकल्पनीय निकाल लागला आहे. या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागांवर विजय मिळाला असून, महायुतीच्या पॅनलला ७ जागा मिळाल्या आहेत. बहुचर्चित ठाकरे बंधूंच्या युतीने या निवडणुकीत उतरवलेल्या पॅनलचा सपशेल पराभव झाला. १८ ऑगस्ट रोजी ही निवडणूक झाली होती. या निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
बेस्टच्या पतपेढीवर राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनची सत्ता आली आहे. दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची पंचवार्षिक निवडणुकीसाठी भर पावसातही कामगारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या निवडणुकीसाठी तब्बल ८३ टक्के मतदान झाले होते. ठाकरे ब्रँड आणि महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
आपणच विजयी झाल्याचा दोन्ही गटांकडून सोशल मीडियावर दावा
पावसामुळे मतमोजणीला उशीर झाला होता. मंगळवारी मध्यरात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. या निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध आमदार प्रसाद लाड अशी प्रमुख लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही गटांकडून आपलाच विजय झाल्याचा दावा सोशल मीडियावरून केला जात होता. शशांक राव यांच्या पॅनलने कोणताही गाजवाजा न करता दणदणीत विजय मिळवला. प्रसाद लाड यांच्या पॅनलला ७ जागा मिळाल्या. ठाकरे बंधुंच्या पॅनलला एकही जागा मिळालेली नाही. शशांक राव यांच्या पॅनलमधील विजयी उमेदवारांची नावे - एकूण १४
१) आंबेकर मिलिंद शामराव
२) आंब्रे संजय तुकाराम
३) जाधव प्रकाश प्रताप
४) जाधव शिवाजी विठ्ठलराव
५) अम्मुंडकर शशिकांत शांताराम
६) खरमाटे शिवाजी विश्वनाथ
७) भिसे उज्ज्वल मधुकर
८) धेंडे मधुसूदन विठ्ठल
९) कोरे नितीन गजानन
१०) किरात संदीप अशोक
महिला राखीव
११) डोंगरे भाग्यश्री रतन
अनुसूचित जाती/ जमाती
१२) धोंगडे प्रभाकर खंडू
भटक्या विमुक्त जाती
१३) चांगण किरण रावसाहेब
इतर मागासवर्गीय
१४) शिंदे दत्तात्रय बाबुराव
प्रसाद लाड यांच्या पॅनेलमधील विजयी उमेदवार – एकूण ७
१) रामचंद्र बागवे
२) संतोष बेंद्रे
३) संतोष चतुर
४) राजेंद्र गोरे
५) विजयकुमार कानडे
६) रोहित केणी
महिला राखीव मतदार संघ
७) रोहिणी बाईत