मेट्रो विद्युत तारांवर बॅनर पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 10:31 AM2024-05-14T10:31:07+5:302024-05-14T10:31:27+5:30

ओव्हर हेड वायरवर बॅनर उडून पडल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली. 

banner fell on metro electric wires | मेट्रो विद्युत तारांवर बॅनर पडला

मेट्रो विद्युत तारांवर बॅनर पडला

अमर शैला, लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाचा मेट्रो सेवेलाही फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिका आणि अंधेरी ते दहिसर पूर्व मेट्रो ७ मार्गिकेच्या ओव्हर हेड वायरवर बॅनर उडून पडल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली. 

वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेच्या एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानकाजवळ ओव्हर हेड वायरवर एक कपडा अडकल्याने मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली. ही घटना सायंकाळी ४:२५ वाजता घडली. यामुळे १० मिनिटे या मार्गिकेवरील सेवा बंद होती. तसेच, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ मार्गिकेवरही एक मोठा बॅनर उडून आल्याने ही सेवा विस्कळीत झाली. गुंदवली स्थानकाच्या ते मोगरा स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायरवर हे बॅनरवर पडले होते. ही घटना सायंकाळी ४:३५ वाजेच्या सुमारास घडली. त्यातून अंधेरी पूर्व ते आरे दरम्यानची मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. सुमारे २५ मिनिटे ही सेवा बंद होती. मेट्रो प्रशासनाने तत्काळ हे बॅनर हटवून सायंकाळी ४:५८ वाजेच्या सुमारास सेवा पूर्ववत केली, अशी माहिती महा मुंबई मेट्रो संचालन मंडळाकडून देण्यात आली.

 

Web Title: banner fell on metro electric wires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई