बँकांचा देशव्यापी संपाचा इशारा

By Admin | Updated: September 30, 2014 01:36 IST2014-09-30T01:36:53+5:302014-09-30T01:36:53+5:30

वेतनवाढीच्या मुद्यावरून आता देशातील सरकारी बँक कर्मचा:यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे.

Banknote strike warning of banks | बँकांचा देशव्यापी संपाचा इशारा

बँकांचा देशव्यापी संपाचा इशारा

मुंबई : वेतनवाढीच्या मुद्यावरून आता देशातील सरकारी बँक कर्मचा:यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. 

इंडियन बँक असोसिएशनने बँक कर्मचा:यांकरिता 11 टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, ही वेतनवाढ अपुरी असून वेतनासोबत पेन्शन तसेच सेवाशर्तीमध्येही बँक संघटनेला काही बदल अपेक्षित आहेत. या संदर्भात येत्या शुक्रवारी इंडियन बँक असोसिएशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास देशातील विविध बँकिंग संघटनांशी चर्चा करून संपाची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सीएच. वेंकटचेलम यांनी दिली. वेतन, सेवाशर्तीत सुधारणा, पेन्शन, आरोग्यविषयक काही सुविधा अशा काही प्रमुख मागण्या आहेत.

Web Title: Banknote strike warning of banks