अभिनेता सलमान खानच्या खटल्यात बाचाबाची

By Admin | Updated: March 18, 2015 01:49 IST2015-03-18T01:49:10+5:302015-03-18T01:49:10+5:30

अभिनेता सलमान खानविरोधातील हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात सरकारी व बचाव पक्ष तसेच बचाव पक्ष आणि पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

Bachabachi in the case of actor Salman Khan | अभिनेता सलमान खानच्या खटल्यात बाचाबाची

अभिनेता सलमान खानच्या खटल्यात बाचाबाची

मुंबई : अभिनेता सलमान खानविरोधातील हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात सरकारी व बचाव पक्ष तसेच बचाव पक्ष आणि पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
सलमानकडे मद्याचा व वाहन चालवण्याचा परवाना नव्हता, याची कागदपत्रे सादर करण्यास न्यायालयाने परवानगी द्यावी, असा अर्ज विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सादर केला. याला बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे यांनी विरोध केला. याचे आरोपपत्र दाखल करताना व आरोप निश्चिती करताना सरकारी पक्षाने हा अर्ज केला नाही. त्यामुळे आता हा अर्ज केला जाऊ शकत नसल्याचा दावा अ‍ॅड. शिवदे यांनी केला. मात्र सरकारी पक्ष असा अर्ज करू शकतो, असा युक्तिवाद अ‍ॅड. घरत यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने सरकारी पक्षाचा अर्ज मंजूर केला.
त्यानंतर उलटतपासणी सुरू असताना पोलीस अधिकारी राजेंद्र कदम व अ‍ॅड. शिवदे यांच्यात शाब्दिक वाद झाला. अखेर न्यायालयाने मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला.

Web Title: Bachabachi in the case of actor Salman Khan