कोण आहेत बाबा सिद्दीकी? ज्यांच्या इफ्तार पार्टीची असते चर्चा, सलमान-शाहरूखशी खास मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 03:34 PM2024-02-08T15:34:39+5:302024-02-08T15:43:44+5:30

गेली ४८ वर्षे काँग्रेसमध्ये असलेल्या बाबा सिद्दीकींनी आज काँग्रेसला रामराम ठोकला

Baba siddique resign from maharashtra congress close friend to salman khan shahrukh khan Bollywood connections | कोण आहेत बाबा सिद्दीकी? ज्यांच्या इफ्तार पार्टीची असते चर्चा, सलमान-शाहरूखशी खास मैत्री

कोण आहेत बाबा सिद्दीकी? ज्यांच्या इफ्तार पार्टीची असते चर्चा, सलमान-शाहरूखशी खास मैत्री

Baba Siddique Resignation, Congress: बाबा सिद्दीकी यांनी महाराष्ट्रात मोठा धक्का दिला. तब्बल ४८ वर्षे पक्षात राहिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी ट्विटरवरून काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली.  महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. राजीनामा देताना त्यांनी लिहिले, "मी तरुण असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आज ४८ वर्षांनी पक्ष सोडत आहे. माझा हा प्रवास खूप छान होता. मी आज माझ्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम देत आहे. अजून अनेक गोष्टी आहेत ज्या आत्ताच सांगणे योग्य होणार नाही. काही गोष्टी या न सांगितलेल्याच बऱ्या असतात. माझ्या या प्रवासात ज्या-ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे." बाबा सिद्दीकी हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्यांसोबतही त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल...

बाबा सिद्दीकी हे अशाच नेत्यांपैकी एक आहेत, जे मुंबईच्या झगमगत्या दुनियेत सहज वावरतात. चित्रपटसृष्टीतही त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. दरवर्षी त्यांच्या इफ्तार पार्ट्यांमध्ये तारे-तारकांची हजेरी असते. सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त यांसारख्या बड्या अभिनेत्यांशी त्यांची घट्ट मैत्री आहे. बाबा सिद्दीकी हे मुंबईतील पक्ष वर्तुळात खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या इफ्तार पार्ट्या मीडियात चर्चेत असतात. सलमान खानचे कुटुंब, शाहरुख खान, पूजा हेगडे, हुमा कुरेशी, इमरान हाश्मी, नर्गिस फाखरी, उर्मिता मातोंडकर, शिल्पा शेट्टी यांसारखे तारे सिद्दिकीच्या वार्षिक इफ्तार पार्टीत सहभागी होत आहेत. २०१३ मध्ये बाबा सिद्दीकींची पार्टी होती, त्यातच सलमान आणि शाहरुखचा वर्षानुवर्षे चाललेला कलह संपला होता. दोघांनी ५ वर्षांनी एकमेकांना मिठी मारली होती. ती पार्टी बरीच चर्चेत राहिली होती.

कोण आहेत बाबा सिद्दीकी?

बाबा सिद्दीकी यांनी तरुणपणी काँग्रेसचे सदस्यत्व घेतले होते. मुंबईत काँग्रेसच्या युवा शाखेत काम करताना सिद्दीकी यांनी राजकारणात आपली कारकीर्द घडवली. १९८८ मध्ये ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. BMC मध्ये दोन वेळा नगरसेवकही होते. बाबा सिद्दीकी १९९९ मध्ये पहिल्यांदा वांद्रे पश्चिममधून आमदार झाले. यानंतर, २००४ आणि २००९ मध्ये - सलग दोनदा जिंकले. २००४ ते २००८ दरम्यान ते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये मंत्री होते.

Web Title: Baba siddique resign from maharashtra congress close friend to salman khan shahrukh khan Bollywood connections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.