ऑक्सिजन सिलिंडरचा अवैध साठा करणाऱ्या दाेघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:06 IST2021-05-16T04:06:55+5:302021-05-16T04:06:55+5:30

साकीनाकामधून ३१ सिलिंडर जप्त लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यभरात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासत असताना, काहीजण काळाबाजार करण्यासाठी याचा ...

Arrested for illegal storage of oxygen cylinders | ऑक्सिजन सिलिंडरचा अवैध साठा करणाऱ्या दाेघांना अटक

ऑक्सिजन सिलिंडरचा अवैध साठा करणाऱ्या दाेघांना अटक

साकीनाकामधून ३१ सिलिंडर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यभरात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासत असताना, काहीजण काळाबाजार करण्यासाठी याचा अवैध साठा करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आली. गुन्हे शाखेच्या कक्ष १०ने साकीनाका परिसरात छापा कारवाई करत ३१ ऑक्सिजन सिलिंडर आणि ५ ऑक्सिजन सिलिंडर किट जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

साकीनाका येथील काजूपाडा भागातील गोडावूनमध्ये अवैधरित्या ऑक्सिजन सिलिंडरचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १० ऑक्सिजन सिलिंडर आणि ५ किट जप्त करण्यात आली आहेत. गोडावून मालक इस्माईल कासीम अली अन्सारी (३८) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत याचा पुरवठा करणाऱ्या सचिन सिंहचे नाव समोर आले. त्यानुसार घाटकोपरमधून त्याला अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईत एकूण ३१ मेडिकल ऑक्सिजन सिलिंडर आणि ५ ऑक्सिजन सिलिंडर किट जप्त करण्यात आले.

दोघांंनी चढ्या भावाने याची विक्री करण्यासाठी साठा करून ठेवल्याचे समोर आले आहे. दोघांविरुद्ध साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

............................................

Web Title: Arrested for illegal storage of oxygen cylinders