Another new tweet by Sanjay Rauta said | Maharashtra Government : संजय राऊतांचं आणखी एक नवं ट्विट, म्हणाले...

Maharashtra Government : संजय राऊतांचं आणखी एक नवं ट्विट, म्हणाले...

मुंबईः राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार लवकरच प्रत्यक्षात अवतरण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत. तसेच तिघांनी एकत्र मिळून सत्ता स्थापन केल्यास कोणाल किती मंत्रिपदं मिळणार आहेत हेसुद्धा जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचीही चर्चा आहे.

विशेष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती समोर आली. आता लवकरच शिवसेनेसोबत चर्चा करून सत्तेतील वाटा आणि इतर विषयांवर चर्चा होणार आहे. सत्तेतील वाटा आणि इतर विषयांवर चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घेऊन लवकरच राज्यात सत्तास्थापन करण्यात येईल, असं बोललं जात आहे. आता शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊतांनी ट्विट करत पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आ जाना ही अच्छा होता हौ! अहंकार के लिये नाही...स्वाभिमान के लिये!,  कधी कधी वाटतं काही नात्यांतून बाहेर पडणंच योग्य असतं. अहंकारासाठी नव्हे, तर स्वाभिमानासाठी, असं म्हणत संजय राऊतांनीभाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

तत्पूर्वी हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था..!!, अशा ट्विटमधून त्यांनी भाजपाला उपरोधिक टोला लगावला होता. तत्पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने नेते खा. संजय राऊत यांनी आता पेढ्यांची ऑर्डर द्यायला हरकत नाही, असे सांगून गोड बातमी लवकरच येईल, असे स्पष्ट केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय असावा, सत्तेचे वाटप कसे करावे, अधिकारी वर्ग कायम ठेवावा की बदलावा यांसह अनेक बारीकसारीक मुद्यांवर चर्चा झाली. ही चर्चा यापुढेही सुरू राहणार आहे. मंत्रिपदांच्या वाटपावर स्पष्टता झालेली नाही. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच त्याचा निर्णय घेण्यात येईल. शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 14 व काँग्रेसचे 12 मंत्री असतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. पण राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा होताच राज्यपालांना भेटण्याचा शिवसेनेचा इरादा असल्याचे समजते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Another new tweet by Sanjay Rauta said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.