amruta fadnavis replied to ncp mla Rohit Pawar on her new song koni mhanale vedi mulgi | रोहित पवारांनी केलेल्या 'त्या' ट्विटवर अमृता फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

रोहित पवारांनी केलेल्या 'त्या' ट्विटवर अमृता फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अमृता फडणवीस (Amruta  Fadnavis) यांच्या नव्या गाण्याचं कौतुक करणारं ट्विट केलं होतं. या ट्विटला अमृता फडणवीस यांनी आज रिप्लाय दिला आहे. धन्यवाद रोहीत भाऊ, असा रिप्लाय देत अमृता फडणवीस यांनी रोहित पवारांचे आभार मानले आहेत. 

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं लाँच करण्यात आलं होतं. 'कुणी म्हणाले वेडी मुलगी' असं शिर्षक असलेलं गाणं अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. ते ऐकल्यानंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केलं होतं. 

"काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करुनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही. पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: amruta fadnavis replied to ncp mla Rohit Pawar on her new song koni mhanale vedi mulgi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.