बाळासाहेबांच्या ४०० कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रुग्णालय उभारा; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 04:30 PM2021-03-11T16:30:54+5:302021-03-11T16:32:20+5:30

MP Imtiaz Jaleel On Balasaheb Thackeray Memorial: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंजुर झालेली ४०० कोटींची रक्कम रुग्णालय उभारण्यासाठी वापरावी अशी मागणी

AIMIM MP Imtiaz Jaleel Construct hospitals instead of Rs 400 cr memorial name them after Bal Thackeray | बाळासाहेबांच्या ४०० कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रुग्णालय उभारा; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

बाळासाहेबांच्या ४०० कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रुग्णालय उभारा; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

googlenewsNext

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंजुर झालेली ४०० कोटींची रक्कम रुग्णालय उभारण्यासाठी वापरावी आणि रुग्णालयाला त्यांचं नाव द्यावं, असा सल्ला एआयएमआयएम (AIMIM) पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. 

राज्याच्या अर्थसंकल्पात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या घोषणेनंतर इम्तियाज जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला सध्या स्मारकांची नव्हे, तर रुग्णालयांची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. (AIMIM MP Imtiaz Jaleel Construct hospitals instead of Rs 400 cr memorial name them after Bal Thackeray)

"बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा प्रत्येकी १०० कोटी खर्चून राज्यात ४ मोठी रुग्णालयं त्यांच्या नावानं सुरू करता येतील", असं इम्तियाज जलील म्हणाले. रुग्णालयांना बाळासाहेबांचं नाव दिलं तरी आमची काही हरकत नाही. जनतेला सध्या स्मारकांची नव्हे, तर रुग्णालयांची गरज आहे, असंही जलील पुढे म्हणाले. 
 

Web Title: AIMIM MP Imtiaz Jaleel Construct hospitals instead of Rs 400 cr memorial name them after Bal Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.