वर्षभरात मेट्रोचे ९ कोटी प्रवासी

By Admin | Updated: June 7, 2015 14:34 IST2015-06-07T01:56:54+5:302015-06-07T14:34:54+5:30

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेतून वर्षभरात ९ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे.

9 million passenger metros during the year | वर्षभरात मेट्रोचे ९ कोटी प्रवासी

वर्षभरात मेट्रोचे ९ कोटी प्रवासी

मनोहर कुंभेजकर, मुंबई
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेतून वर्षभरात ९ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो रेल्वेच्या वर्षपूर्तीनिमित्त मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभयकुमार मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. ३१ मेपर्यंत मेट्रोने १३ लाख किलोमीटर प्रवास केला असून, १.१२ लाख फेऱ्या झाल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.
८ जून रोजी मेट्रोला एक वर्ष पूर्ण होत असून, पहिल्या वर्षात मेट्रो फायद्यात नाही, असेही त्यांनी सांगितले. आजही मेट्रो रेल्वे सकाळी सुरु करण्यापूर्वी पहाटे ४ ते ५ दरम्यान चालकाकडून मेट्रोची चाचणी घेण्यात येते. शिवाय सुट्टीवर गेलेला पायलट पुन्हा रुजू झाल्यास त्याला प्रशिक्षण देण्यात येते. दिवसाला मेट्रोच्या ४०० फेऱ्या होत असून, त्यातून २.६० लाख प्रवासी प्रवास करत आहेत. महिलांसाठी मेट्रोत खास कक्ष सुरु करण्यात आला असून, प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड, सरकते जिने यासह उर्वरित सुविधा दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा रक्षकांनी प्रवाशांशी सौजन्याने कसे वागवे? याचेही प्रशिक्षण त्यांना देण्यात येत आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना नाहक त्रास झालेला नाही. प्रवासादरम्यान गहाळ झालेले साहित्य त्यांना परत देण्यात आले आहे.

Web Title: 9 million passenger metros during the year