पाणीपट्टीत आठ टक्के वाढ

By Admin | Updated: June 16, 2015 01:31 IST2015-06-16T01:31:07+5:302015-06-16T01:31:07+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीपट्टीत आठ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे़ या दरवाढीची झळ झोपडपट्टीतील ग्राहकांनाही बसणार आहे़

8 percent increase in water supply | पाणीपट्टीत आठ टक्के वाढ

पाणीपट्टीत आठ टक्के वाढ

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीपट्टीत आठ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे़ या दरवाढीची झळ झोपडपट्टीतील ग्राहकांनाही बसणार आहे़ स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आलेल्या या दरवाढीतून पालिकेला १०७ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे़
तत्कालीन महापालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी चार वर्षांपूर्वी पालिकेच्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करून घेतली होती़ त्यानुसार दरवर्षी पाणीपट्टीमध्ये आठ ते दहा टक्के वाढ होत आहे़ यामध्ये झोपडपट्टी, इमारती आणि चाळींच्या पाणीपट्टीतही वाढ प्रस्तावित आहे़ मात्र ५०० चौ़ फुटांहून छोट्या घरांमधील ग्राहकांना या दरवाढीतून वगळण्यात आले आहे़ स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे़
बाटलीबंद पाणी, शीतपेय महागणार
बाटलीबंद पाणी आणि शीतपेय विकणाऱ्या कंपन्यांना प्रति हजार लीटर पाण्यासाठी ९० रुपये आकारण्यात येत होते़ यामध्ये वाढ करून यापुढे प्रति हजार लीटरसाठी ९७ रुपये २० पैसे इतका दर महापालिका आकारणार आहे़ (प्रतिनिधी)

(हे दर प्रति हजार लीटरसाठी लागू)
ग्राहकजुने दरप्रस्तावित
गलिच्छ वस्त्या३़२४३़४९
(सार्व़ शौचालयांच्या देखभालीची जबाबदारी मंडळाने घेतली असल्यास)
गलिच्छ वस्त्या३़५९३़८७
(सार्व़ शौचालयांची देखभाल पालिकेकडे असल्यास)
घरगुती ग्राहक४़३२४़६६
बिगर व्यापारी संस्था१७़२८१८़६६
व्यावसायिक संस्था३२़४०३४़९९
उद्योगधंदे, कारखाने४३़२०४६़६५
रेसकोर्स, तारांकित हॉटेल्स ६४़८० ६९़९८
बॉटलिंग प्लांट९०९७़२०

- या करावरच मलनिस्सारण कर आकारण्यात येत असल्याने प्रत्यक्षात ही वाढ प्रति हजार लीटरसाठी शंभर रुपये एवढी असणार आहे़

Web Title: 8 percent increase in water supply