डम्परच्या धडकेत १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, चालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:54 IST2019-11-12T05:54:42+5:302019-11-12T05:54:44+5:30

कुर्ला येथे डम्परच्या धडकेत १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.

3-year-old girl killed, driver arrested in dumper collision | डम्परच्या धडकेत १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, चालकाला अटक

डम्परच्या धडकेत १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, चालकाला अटक

मुंबई : कुर्ला येथे डम्परच्या धडकेत १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मुलीच्या मृत्यूनंतर कुर्ल्यामध्ये संतापाची लाट उसळली असून कुर्ला पोलिसांनी आरोपी डम्पर चालकाला अटक केली.
कुर्ला येथील सकिनाबाई चाळीमध्ये राजू खैरनार (३०) हे कुटुंबासोबत राहतात. खैरनार यांची १२ वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी गेली असताना भरधाव वेगाने आलेल्या डम्परने तिला जोरदार धडक दिली. यात मुलगी गंभीर झाली होती. स्थानिकांनी तत्काळ या मुलीला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली होती. घटनेची वर्दी मिळताच कुर्ला पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून अधिक तपास सुरू केला आहे. राजू खैरनार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: 3-year-old girl killed, driver arrested in dumper collision