१७ वर्षीय मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: May 21, 2015 01:10 IST2015-05-21T01:10:47+5:302015-05-21T01:10:47+5:30

एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी गणेश नावकर (२०) या तरुणाला अटक केली आहे.

17-year-old girl raped | १७ वर्षीय मुलीवर बलात्कार

१७ वर्षीय मुलीवर बलात्कार

मुंबई : एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी गणेश नावकर (२०) या तरुणाला अटक केली आहे. व्यवसायाने ढोलताशे वाजविणारा हा तरुण पोयसरमध्ये पीडित तरुणीच्या शेजारी राहतो. तिला लग्नाचे आमिष देऊन ९ मे रोजी त्याने तिचे अपहरण करून तिला पळवून नेले. त्यानंतर हे दोघे पुण्यात एक घर भाड्याने घेऊन राहत होते. याची तक्रार मुलीच्या आईने १० मे रोजी समता नगर पोलीस ठाण्यामध्ये केली. आमचे एक पथक या मुलीच्या शोधार्थ पुण्याला जाऊन आले, मात्र या दोघांचा काहीच ठिकाणा सापडला नाही. मात्र मंगळवारी मध्यरात्री हे दोघे स्वत:हून परत आले. बलात्काराचा गुन्हा दाखल करून दिंडोशी सत्र न्यायालयात हजर केले असे समता नगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक आशा गायकवाड यांनी सांगितले(प्रतिनिधी)

Web Title: 17-year-old girl raped