Join us
Daily Top 2Weekly Top 5

6 अभिनेत्यांनी रिजेक्ट केलेला सिनेमा जोया अख्तरने दिला होता अखेर भावाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 12:52 IST

2009मध्ये जोयाने तिच्या पहिला सिनेमाचे दिग्दर्शन केले.

बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका एकेकाळी  कॉपीराइटर होती. मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे बघितल्यानंतर जोयाने दिग्दर्शिका होण्याचा निर्धार केला. 2009मध्ये जोयाने तिच्या पहिला सिनेमाचे दिग्दर्शन केले. या सिनेमाचे नाव 'लक बाय चान्स' होते. यात जोयाचा भाऊ फरहान अख्तरने मुख्य भूमिका साकारली होती.  हा सिनेमा स्ट्रग्लिंग अभिनेत्याच्या आयुष्यावर आधारित होता. 

आजतकच्या रिपोर्टनुसार, जोयाने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, फरहानला ही भूमिका देण्याआधी  या सिनेमाची ऑफिर तिने आधी सहा अभिनेत्याना दिली होती, मात्र त्यासगळ्यांनी नकार दिला. आम्हा सगळ्यांना माहिती होते की फरहान हा एक चांगला अभिनेता आहे. जोयाने त्याला विचारले की माझ्या सिनेमात तू काम करशील का?, कारण या सिनेमात कुणालाच काम करायचे नाही. फहानच्या आधी तिने या सिनेमाची स्क्रिप्ट सहा अभिनेत्यांना दिली होती मात्र त्यांनी नकार दिला होता.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, फरहान तूफान या आगामी सिनेमात दिसणार आहे. फरहान आता तुफान सोबत बॉक्सिंग रिंग मध्ये पाय ठेवण्यास सज्ज झाला आहे. आरओएमपी पिक्चर्ससोबत एक्सेल एंटरटेनमेंट प्रोडक्शनचा तुफान राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित करत आहे.

टॅग्स :फरहान अख्तर