Join us

Tu Tevha Tashi : एकच एक नंबर, कसला कडक? ‘तू तेव्हा तशी’चं नवं गाणं पाहून प्रेक्षक कन्फ्युज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 10:30 IST

Tu Tevha Tashi New Song: ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत नवं गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या रविवारी मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रदर्शित होणार आहे. या भागात कलाकार या गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत. सध्या याच गाण्याची चर्चा आहे...

झी मराठीवर अनेक मालिकांची रेलचेल सुरू आहे. यातील अनेक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्या आहेत. ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi ) ही अशीच एक प्रेक्षकांची आवडती मालिका. सध्या या मालिकेत एक ना अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत लगीनघाई सुरू आहे. लग्न कुणाचं तर अनु आणि पट्याचं. दोघांच्या नात्याला कावेरीनं म्हणजेच अनुच्या आईनं परवानगी दिली. त्यामुळे दोन्ही घरांमध्ये लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. अशात मालिकेत नवं गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या रविवारी मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रदर्शित होणार आहे. या भागात कलाकार या गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत. सध्या याच गाण्याची चर्चा आहे.  मालिकेतील नव्या गाण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सूक होते मात्र गाण्याचा टीझर पाहून प्रेक्षकांचा रसभंग झाला आहे. अनेकांनी या गाण्याती तुलना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेशी केली आहे.

‘तू तेव्हा तशी’ मालिकेत ‘जाऊबाई नादांयला’ हे गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘धिंगाणा गोंधळ लग्नाआधीच गं, जाऊबाई नांदायला येणार घरात गं...’, अशा गाण्याच्या ओळी आहेत. गाण्याच्या टीझरमध्ये अनु आणि पट्यासह सगळीच मंडळी थिरकताना दिसत आहेत. काही दिवसांआधीच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यश आणि नेहा यांच्या लग्नात परीनं आईसाठी गाणं गायलं होतं. परीनं गायलेलं ’आईचं लग्न’ हे गाणं आणि ‘जाऊबाई नांदायला’ हे गाणं सारखंच असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.  

‘रेशमीगाठ’ मधील आईचं लग्न आणि जाऊबाई नांदायला येणार गं या दोन्ही गाण्यांची बेसीक ट्यून सारखीच आहे. पण दोन्ही गाणी छान झालीत, अशी कमेंट एका युजरने केली आहे.  तर अन्य एका युजरने या गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एकच एक नंबर, कसला कडक, अशी प्रतिक्रिया या युजरने दिली आहे. अनेक प्रेक्षकांना मात्र हे गाणं आणि त्यावरचा कलाकारांचा डान्स भलताच आवडला आहे. ‘जाऊ बाई नांदायला’ या गाण्यात अनु आणि वल्ली या आमनेसामने येणार आहेत. वल्ली आणि अनुमध्ये चांगलीच टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.   

टॅग्स :झी मराठीस्वप्निल जोशीटेलिव्हिजन