Join us

नाईक आहेत ते, परत येणारच...! ‘रात्रीस खेळ चाले 3’ बॅक...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 15:33 IST

Ratris Khel Chale 3 :लाडकी मालिका पुन्हा एकदा पाहता येणार असल्याने चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे ‘रात्रीस खेळ चाले ’मालिकेतील माई, अण्णा, सुषमा, दत्ता, छाया, वच्छी, पांडू, शेवंता, अभिराम अशा सर्वच पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले.

‘रात्रीस खेळ चाले 3’ बॅक!!  होय, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी  ‘रात्रीस खेळ चाले 3’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच, मालिकेचे नवे एपिसोड प्रेक्षक एन्जॉय करू शकणार आहेत.कोरोना महामारीमुळे  ‘रात्रीस खेळ चाले 3’चे शूट बंद होते. त्यामुळे मालिका रखडली होती. पण आता लवकरच शूट सुरू होऊन पुढील महिन्यात  पुन्हा या मालिकेची वाटचाल सुरू होणार असल्याचे कळतेय.‘रात्रीस खेळ चाले 3’च्या लेखकद्वयींपैकी एक प्रल्हाद कुडतरकर यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत.

‘लवकरच मालिकेचे शूटिंग सुरु होईल. त्यानंतर मालिका लगेचच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कोकणात सध्या प्रचंड पाऊस सुरु असल्यामुळे पावसाचा व्यत्यय आहेच; पण  मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याची इच्छा आहे. तिसºया पर्वातील गोष्ट काही वर्षांनंतरची आहे. त्यामुळे लोकांना बरेच प्रश्न पडले असतील त्यांची उत्तरं पुढील भागांमध्ये मिळतील,’ असे त्यांनी सांगितले.वाडा विकला जाईल का? या प्रश्नांची उत्तर रंजकपणे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले.

 ‘रात्रीस खेळ चाले ’मालिकेतील माई, अण्णा, सुषमा, दत्ता, छाया, वच्छी, पांडू, शेवंता, अभिराम अशा सर्वच पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या सर्वच कलाकारांनी जीव ओतून आपल्या भूमिका साकारल्या होती, त्यामुळे आजही ही सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मालिकेत माधव अभ्यंकर यांनी साकारलेले खलनायक अण्णा नाईक या पात्राने तर प्रत्येकाच्याच मनात भिती निर्माण केली, तर अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेल्या शेवंता या पात्राने भुरळ घातली होती. मालिकेचे तिसर पर्वही लोकांना आवडले आहे.  

टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३