Join us  

"फराहने मला शिवीगाळ केली, चप्पल फेकून मारली..", जायेद खानने सांगितला शूटिंगचा 'तो' प्रसंग; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 12:27 PM

‘मैं हूं ना’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फराह खानने जायदचा शिवीगाळ करत चप्पल फेकून मारल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता जायेद खानने शाहरुख खान स्टारर 'मैं हूं ना' या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अनेक किस्से घडले होते. फराह खानने चित्रपटाच्या सेटवर त्याला खूप ओरडली होती. अगदी जायेदने फराहला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर चप्पल फेकली. नुकतीच या चित्रपटाला १९ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने जायेदने काही आठवणी सांगितल्या आहेत.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जायेद खानला विचारण्यात आले की, चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘चले जैसे हवाएं’ शूट करणे किती कठीण होते. यावर उत्तर देताना जायेद म्हणाला, यावर अभिनेत्याने सांगितले की, या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान आपल्याला खूप कठीण प्रसंग आला होता. याच्या निर्मितीदरम्यान फराहही नाराज झाली होती.

जायेद पुढे म्हणाला, आम्ही खूप उंचीवर शूट करत होतो. एका टेकनंतर आमची अवस्था खराब व्हायची. मला आठवतं शूटिंगदरम्यान कॅमेऱ्यात अमृता रावचा सीन शूट केला होता. त्यानंतर कॅमेरा माझ्या दिशेने आला. माझ्या आजूबाजूचा प्रत्येकजण सीनसाठी तयार होता. पण कॅमेरा माझ्याकडे आला आणि माझ्या शेजारी डान्स करणारा एक जण खाली पडला. "त्याला स्ट्रोक आला होता, कारण तो खूप थकला होता. मला काय करावे हे समजत नव्हते. मी परफॉर्म करायला सुरुवात केली पण नंतर मला जाणवलं की मला या मुलाच्या वरती डान्स करावा लागेल. . त्यामुळे मला काहीच सुचलं नाही आणि मी फराहच्या रागाला न जुमानता कट म्हटले.”

जायेद म्हणाला, फराह खूप चिडली होती. तिने मला शिवीगाळ केली आणि चप्पल फेकून मारली. जावेद फराहला म्हणाला, तु अशी अपेक्षा माझ्याकडून कशी करु शकतेस की मी जीव जाणाऱ्या त्या व्यक्तिच्यावर डान्स करु. ती ओरडली, ‘तुम्ही माझ्या सेटवर कट म्हणू शकत नाही, मी कट म्हणेन’. शेवटी, युनिटच्या सदस्यांना तो गरीब माणूस पडलेला दिसला. तो वाचला. मग आम्ही ते पुन्हा शूट केलं आणि तो सीन संपला.”

दरम्यान, जायेद खानने २००३ मध्ये चुरा लिया है तुमने या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर आलेल्या मैं हूँ ना या चित्रपटातून त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळली. या चित्रपटात त्याला शाहरुख खान, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी आणि अमृता राव या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करायची संधी मिळाली.

टॅग्स :जायेद खानफराह खान