सध्या एक शॉर्ट फिल्म यू ट्यूबवर गाजत असून, १९ लाख तरुणांच्या हिट्स त्या शॉर्ट फिल्मला मिळाल्या आहेत. रिवाइंड नावाची ही शॉर्ट फिल्म आहे आदिनाथ कोठारे आणि सोनाली कुलकर्णी यांची. दोघांची ही पहिलीच हिंदी शॉर्ट फिल्म आहे. याबद्दल सीएनएक्सने आदिनाथशी संवाद साधला असता तो म्हणाला, माझा मित्र नीरज उधवानी याने मला ही कथा ऐकवली. मला ती आवडल्याने मी यात काम करण्याचे ठरविले. मी ही शॉर्ट फिल्म प्रोड्युसदेखील केली आहे. सोनालीला विचारले असता तिनेसुद्धा काम करण्यास होकार दिला आणि या शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने आमच्या तिघांच्या मैत्रीचे बंध फुलले. कॉलेजियन्स मुले-मुली तारुण्याच्या वयात काही गोष्टींसाठी कशा प्रकारे भरकटली जातात, याची कथा यामध्ये मांडली आहे. आम्ही तिघे लवकरच एक फिल्म घेऊन येत आहोत. सध्या स्क्रिप्टवर काम सुरू असून, ही फिल्म हिंदी किंवा मराठीमध्ये लवकरच येईल, अशीही गोड बातमी आदिनाथने सीएनएक्सच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना दिली आहे.
आदिनाथच्या रिवाइंडला तरुणांच्या हिट्स
By admin | Updated: March 17, 2016 01:57 IST