Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तू माझी ताकद आणि...", रेशम टिपणीसची लेकीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:22 IST

Resham Tipnis : रेशम टिपणीसच्या मुलीचे नाव रिशिका असून आज तिचा वाढदिवस आहे.

हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी रेशम टिपणीसचा (Resham Tipnis) प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. छोटा पडदा गाजवणारी रेशम बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातून चर्चेत आली होती. सध्या ती वस्त्रहरण या नाटकात काम करताना दिसते आहे. दरम्यान रेशमने तिच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

रेशम टिपणीसच्या मुलीचे नाव रिशिका असून आज तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्रीने तिच्यासोबतचे फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले की, काय बोलू... बस्स तू आनंदी राहा. तुला खूप आनंद मिळत राहो. बाप्पा तुला तुझ्या आयुष्यात आनंद देईल अशी आशा आहे आणि तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होवोत. राजा खूप खूप आनंदी राहा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझी ताकद आणि माझी विकनेसपण. जा सिमरन जी ले अपनी जिंदगी. हॅप्पी बर्थडे चिनू.

रेशम टिपणीसची लेक रिशिका क्रिएटिव्ह डिरेक्टर, फोटोग्राफर आणि लेखिका आहे. ती आईप्रमाणेच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस आहे. आईप्रमाणेच रिशिकाही मॉर्डन विचारांची आहे. रिशिका मनमौजी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारी असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. रिशिका सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिच्या सोशल मीडियावर रेशमसोबतचे फोटो पाहायला मिळतात.   

टॅग्स :रेशम टिपणीस