Join us
Daily Top 2Weekly Top 5

हो, आम्ही लग्न करतोय - बिपाशा बासू

By admin | Updated: April 7, 2016 14:39 IST

बिपाशा व करणसिंग ग्रोव्हर ३० एप्रिल रोजी लग्न करत असून त्या दोघांनीही या वृत्ताला एका निवेदनाद्वारे अधिकृत दुजोरा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - बिपाशा बसू व करणसिंग ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी.... ते दोघे लग्न करणार असल्याची बातमी 'लोकमत'नेच तुमच्यापर्यंत पोहोचवली होती आणि आता त्या दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून एक संयुक्त अधिकृत निवेदनही जारी केले आहे. 
अभिनेत्री प्रियांका चोप्राने ट्विटरवरून बिपाशा- व करणला शुभेच्छा देत त्यांच्या लग्नाची बातमी फोडली होती. त्यावरून चर्चा सुरू झालेली असतानाच आता खुद्द बिपाशा-करणनेच ही बातमी खरी असल्याचे सांगत आपण ३० एप्रिलला विवाहबंधनात अडकणार असल्याचे नमूद केले. 
' आमच्या आयुष्यातील अतिशय आनंदाची व विशेष बातमी सर्वांसोबत शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ३० एप्रिल हा (लग्नाचा) आमच्यासाठी एक महत्वाचा आणि मोठा दिवस असून त्यासाठी आम्ही आमचे कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी, चाहते आणि शुभेच्छुकांचे मनापासून आभार मानतो. मात्र आमचे लग्न एक खासगी, कौटुंबिक समारंभ असेल. आत्तापर्यंत आमच्या खासगी आयुष्याचा आदर राखल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. आमच्या नवीन आयुष्याला सुरूवात करताना तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा आमच्या पाठीशी असतील अशी आम्हाला आशा आहे' अशा शब्दांत बिपाशा-करणने ही गुड न्यूज शेअर केली.