Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याकडून कौतुकाचे शब्द ऐकून यामी गौतम झाली भावूक, डोळ्यात आलं पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 17:11 IST

आदित्य धरनं लाडक्या बायकोचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.  

अभिनेत्री यामी गौतमच्या "आर्टिकल ३७०" या सिनेमाचा ट्रेलर सोहळा नुकताच पार पडला. या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला हजेरी लावताच यामीनं चाहत्यांना सुखद धक्का दिला. यावेळी यामीने आपला बेबी बंप फ्लाँट केला आहे.सध्या सोशल मीडियावर यामी गौतमचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये आदित्य धर आणि यामी आनंदी दिसून आले. तर यावेळी आदित्य धरनं लाडक्या बायकोचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.  

"आर्टिकल ३७०"च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात यामी गौतम आणि तिचा पती आदित्य धर यांच्यातील बाँन्डिंग दिसून आलं. आदित्यने यामीची मनापासून प्रशंसा केली. तो म्हणाला, 'खरोखर मला वाटते की मी भाग्यवान आहे की मी तिच्याशी लग्न केलं. कारण एक माणूस म्हणून ती खूप चांगली आहे. ती धार्मिक आहे. तिच्या कामाबद्दल खूप प्रोफेशनल आहे. जर तुम्ही तिला सकाळी ६ वाजता शूटसाठी बोलावलं. तर ती ५.३० ला सेटवर पोहचते. त्यासाठी ती 3:30 वाजता उठेल. सर्व अवरून पुजा करेल. त्यामुळे मी व्यावसायिक-वैयक्तिकरित्या नशीबवान आहे. मला वाटते की मी या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्तींपैकी एक आहे'.आदित्यचे हे शब्द ऐकताच यामी भावूक झाली. 

यामी गौतम आणि आदित्य धर यांची 2019 मध्ये 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'च्या सेटवर भेट झाली होती. या जोडप्याने दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर 4 जून 2021 रोजी लग्न केलं.   लग्नाच्या 3 वर्षानंतर यामी आणि आदित्य आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. आदित्य हा दिग्दर्शक आहे. तर यामीचा "आर्टिकल ३७०" हा सिनेमा 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.  काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं होतं. यावरच आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

टॅग्स :यामी गौतमसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड