Join us

इमरानला करायचंय सलमानसोबत काम

By admin | Updated: July 31, 2014 05:02 IST

सलमान खानसोबत काम करण्याचे स्वप्न बॉलीवूडमधील प्रत्येक कलाकाराचे असते. या यादीत आता इमरान हाश्मीचेही नाव जोडले गेले आहे.

सलमान खानसोबत काम करण्याचे स्वप्न बॉलीवूडमधील प्रत्येक कलाकाराचे असते. या यादीत आता इमरान हाश्मीचेही नाव जोडले गेले आहे. नुकतेच एका मुलाखतीत सलमानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे इमरानने सांगितले. या इच्छेबाबत त्याचे म्हणणे होते की, ‘सलमान भाईसोबत काम करण्याची जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी तयारच असेन, त्यासाठी स्क्रिप्ट मात्र चांगली असायला हवी. चांगली स्टोरी असली तरच त्याच्यासोबत काम करायला मजा येईल. सध्या तरी असा एकही प्रोजेक्ट नाही.’