Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिकच्या सेटवर काम करण्याचा वर्कर्सचा नकार

By admin | Updated: July 2, 2015 03:57 IST

हृतिक रोशन आणि पूजा हेगडे हे ‘मोहेंजोदाडो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पेमेंट न मिळाल्याच्या कारणावरून नयगाव येथील रामदेव स्टुडिओजमध्ये सेट उभारण्याबद्दल

हृतिक रोशन आणि पूजा हेगडे हे ‘मोहेंजोदाडो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पेमेंट न मिळाल्याच्या कारणावरून नयगाव येथील रामदेव स्टुडिओजमध्ये सेट उभारण्याबद्दल वर्कर्सनी नकार दिला आहे. त्यामुळे आशुतोष गोवारीकर यांना चांगलाच झटका बसला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ते मुंबईबाहेरच्या एका ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्चापेक्षा दीडपट जास्त पेमेंट मिळाले पाहिजे. रविवारपासूनच वर्कर्सनी काम थांबवले असून दीडपट पेमेंट वाढवून देण्याची त्यांची मागणी आहे.