Join us
Daily Top 2Weekly Top 5

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये प्रेम राधापर्यंत पोहोचू शकेल का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 09:23 IST

राधा अचानक प्रेम काय तर सगळ्यांच्याच आयुष्यामधून निघून गेली. देवयानी आणि दीपिकाचा हा खेळ चांगलाच यशस्वी ठरला.

ठळक मुद्देदेवयानीने प्रेमच्या मनामध्ये राधाबद्दल गैरसमज निर्माण केले जेणेकरून तो दिपिकाशी लग्न करेल.

राधा आणि प्रेम यांच्या प्रेमाची सुरुवातच मुळी वेगळ्याप्रकारे झाली. राधा आणि प्रेम कसे एकमेकांच्या प्रेमामध्ये गुंतत गेले, अडकले, कधी ती भावना एकमेकांच्या मनामध्ये आली हे त्यांचे त्यांना देखील कळाले नाही. राधा – प्रेमच्या अबोल प्रेमाची साक्ष देशमुख आणि निंबाळकर कुटुंब देखील होते. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. अचानक एका घटनेने किंवा राधाच्या एका निर्णयाने सगळेच बदलून गेले. राधा अचानक प्रेम काय तर सगळ्यांच्याच आयुष्यामधून निघून गेली. देवयानी आणि दीपिकाचा हा खेळ चांगलाच यशस्वी ठरला. देवयानीने प्रेमच्या मनामध्ये राधाबद्दल गैरसमज निर्माण केले जेणेकरून तो दिपिकाशी लग्न करेल. या सगळ्याशी अनभिज्ञ राधा प्रेमा या नावाने इंदौरला आनंद नाडकर्णी यांच्या इस्पितळात परिचारिका म्हणून काम करते आहे हे आधी कोणालाच माहिती नव्हते. परंतु आता हा गुंता हळूहळू सुटू लागला आहे. विश्वनाथ यांनी म्हणजेच प्रेमच्या सावत्र वडीलांनी जेंव्हा प्रेमला देवयानीचे कारस्थान सांगितल आणि तिचा या मागचा हेतू प्रेम आणि राधाला वेगळे करणे होता हे सांगितले. परंतु, येणाऱ्या काही भागांमध्ये प्रेमला राधा सुखरूप असल्याचे कळणार आहे पण तिचा ठावठिकाणा कळणार नाही. राधाला प्रेम कसा शोधणार ? त्यांची भेट होणार का ? हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.  

विश्वनाथ यांनी देवयानी आणि दीपिकाचा खरा चेहरा प्रेम समोर आणला आणि सत्य सांगितले तसेच हे सगळे त्यांना माहिती होते हे देखील सांगितले. निस्वार्थी, जीवापाड प्रेम करणारी राधा आणि स्वार्थी – कट कारस्थान करणारी दीपिका यांच्या मध्ये कधीच तुलना होऊ शकत नाही असे प्रेमने माधुरीला सांगितले. परंतु परिस्थितीमुळे प्रेमला कदाचित दीपिकाशी लग्न करावा लागेल. यामध्ये प्रेमचा काय हेतू आहे ? तो हे लग्न खरच करणार आहे ? कि, यामध्ये काही रहस्य आहे ? या सगळ्या निरुत्तरित प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

टॅग्स :कलर्स मराठी