Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 18:30 IST

'रामायण 3D' या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता झळकणार असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देप्रभासची लोकप्रियता पाहाता त्याने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारावी अशी या चित्रपटाच्या टीमचे म्हणणे असल्याची चर्चा रंगली आहे. 

दंगल दिग्दर्शक नितेश तिवारीने रामायण 3D ची घोषणा केल्यापासून फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या सिनेमाचे एकूण बजेट 600 कोटींचे असून कोणत्याही बॉलिवूड चित्रपटासाठी हे खूपच जास्त आहे. हा सिनेमा 3D मध्ये रिलीज करण्यात येणार असल्याने या चित्रपटावर सध्या चांगलीच मेहनत घेतली जात आहे. इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार हृतिक रोशन यात प्रभू रामाची भूमिका साकारणार आहे तर दीपिका पादुकोण सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. पण अद्याप तरी चित्रपटाच्या टीमकडून या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही.  

नितेश तिवारीने एका मुलाखतीदरम्यान नुकतेच सांगितले होते की, सध्या या सिनेमाचे पेपर वर्क सुरू आहे. बाकी गोष्टीच्या प्रोसेस आम्हाला आधी संपवायच्या आहे. कास्टबाबत अजून काही विचार केलेला नाहीये. हृतिक रोशन आणि दीपिकाबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर त्याने काहीही सांगण्यास नकार दिला होता. पण या चित्रपटाच्या बाबतीत आता एक नवीन बातमी येत आहे. या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता झळकणार असल्याची चर्चा आहे. हा अभिनेता म्हणजे बाहुबली फेम प्रभास असून पिंकव्हिलाने त्यांच्या वृत्तात याविषयी माहिती दिली आहे. प्रभासची लोकप्रियता पाहाता त्याने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारावी अशी या चित्रपटाच्या टीमचे म्हणणे असल्याची चर्चा रंगली आहे. 

रामायण या प्रोजेक्टवर आलू अरविंद, नमीत मल्होत्रा, मधू मंतेना काम करत असून नितेश तिवारीने नुकत्याच दिलेल्या पिंकव्हिलाच्या मुलाखतीत सांगितले आहे की, छिछोरे या चित्रपटानंतर मी रामायण या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात राम, सीता यांच्या भूमिकेत कोण असणार हे अद्याप तरी ठरलेले नाही. 

गेल्या तीन वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम सुरू असून हिंदी, तमीळ, मराठी, गुजराती आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमीळ, तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

बाहुबली या चित्रपटाच्या दोन्ही भागांमुळे प्रभासला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या साहो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्याच्या या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

टॅग्स :हृतिक रोशनदीपिका पादुकोणप्रभास