Join us  

मराठीत काम करणार नाही

By admin | Published: March 20, 2017 1:40 AM

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खाननं आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध हिंदी सिनेमांत आमिरनं साकारलेल्या

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खाननं आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध हिंदी सिनेमांत आमिरनं साकारलेल्या विविधरंगी भूमिका रसिकांच्या मनात घर करून आहेत. मध्यंतरीच्या काळात आमिर खान मराठीचे धडे गिरवत होता. त्यामुळे आमिर लवकरच मराठी सिनेमात काम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या; मात्र आमिरच्या फॅन्ससाठी एक बातमी आहे, ती म्हणजे आमिर खान एवढ्यात मराठी सिनेमा करणार नाही. मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा खूप आहे; मात्र आपले मराठी इतके काही चांगले नसल्याची कबुली खुद्द आमिर खानने दिली आहे. मराठीमधून संवाद साधण्याचा आपण कायम प्रयत्न करत असतो. माझ्या मराठी बोलण्याला मी २०० गुण देईन; मात्र हा गंमतीचा भाग असला तरी आपलं मराठी काही इतकं छान नाही, अशी प्रांजळ कबुली खुद्द आमिर खाननं दिली आहे. कॅमेऱ्यासमोर मराठीत कुणी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर आपण त्यांना मराठी भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्या वेळी पटकन काही शब्द आठवत नाही. त्यामुळे अडखळत-अडखळत मराठी बोलत बोलण्याचा ट्रॅक आपोआप हिंदीवर शिफ्ट होत असल्याचं मिस्टर परर्फेक्शनिस्टनं सांगितलं. भाषांमध्ये आपण थोडे कच्चे असून परफेक्ट मराठी बोलण्यासाठी आणखी किमान ३-४ किंवा ५ वर्षं तरी लागतील, असं आमिरनं सांगितलं. जेव्हा उत्तम मराठी बोलेन त्याच वेळी मराठी सिनेमात काम करेन, अशी ग्वाहीसुद्धा आमिर खाननं दिली आहे.