Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना आणि सैफ अली खानला मुलगा होणार की मुलगी? ज्योतिषाने केली भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 15:57 IST

नवीन बाळाच्या जन्माआधी सैफ अली खान आणि करीना कपूर मुलगा तैमूरसोबत नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. करीनाने त्याची झलक सोशल मीडियावर दाखवली  होती.

करीना कपूर सध्या प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. करीना फेब्रुवारी महिन्यातच दुसर्‍या बाळाला जन्म देणार असल्याचे माहिती समोर येत आहे. सैफ अली खानने फेब्रुवारीमध्येच बाळाचा जन्म होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, करीनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करीना  डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये करीना खूपच सुंदर दिसत आहे. 

 

तिने ऑरेंज कलरच्या फ्लॉवर स्लीव्ह टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. गेल्या काही दिवसांपासून करिनाच्या प्रेग्नंसीबाबतच्या चर्चा सोशल मीडियावरही रंगत आहे. त्यातच करिनाला मुलगा होणार की मुलगी याकडेच तिच्या चाहत्यांचेही लक्ष लागले आहे.

 

मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत करिनाला पहिले बाळ मुलगीच व्हावी अशी ईच्छा होती पण मुलगा झाला तैमूर असे तिने सांगितले होते. त्यामुळे दुस-यांदा तरी मुलगी व्हावी अशी करिनाचीही ईच्छा असणार. दरम्यान एका ज्योतिषीनेही करिनाचे दुसरे बाळ हे मुलगीच असेल अशी भविष्यवाणीच केली आहे.

अनुष्का आणि विराट कोहली यांनाही मुलगी होणार असल्याची भविष्यवाणी केली होती ती अगदी तंतोतंत लागू ठरली आणि अनुष्काने मुलीला जन्म दिला. अगदी त्याचप्रमाणे करिनाच्याही बाबतीत भविष्यवाणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता करिनाबाबत ही भविष्यवणी कितपत लागू ठरते हे तर वेळ आल्यावरच स्पष्ट होईल.

नवीन बाळाच्या जन्माआधी सैफ अली खान आणि करीना कपूर मुलगा तैमूरसोबत नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. करीनाने त्याची झलक सोशल मीडियावर दाखवली  होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी राहत असलेल्या इमारतीच्या शेजारीच एक घर घेतले आहे. जे घर फॉर्च्युन हाईट्समधील घराच्या दुप्पट आहे.

 

फॉर्च्युन हाईट्सचे शेवटचे दोन मजले हे करीना आणि सैफचे आहेत. करिनाने तिच्या नवीन घराचा फोटो चाहत्यांसह शेअर केला. फोटो शेअर करत समर्पक अशी कॅप्शनही दिली होती. सध्या तिच्या नवीन घराचीच जास्त चर्चा आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान